शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दिवाळीचा फराळ

दिवाळीचा फराळ जोक्स विनोद
दिवाळीच्या फराळाचे स्वयंपाक घरात चालले असता राधावाईंनी मुलास आगगाडी खेळण्यासाठी देऊन बाहेर जाण्यास सांगितले. पण थोड्याच वेळानेच चिंरजीवांची स्वारी आगगाडी लोटत लोटत स्वयंपाकघराच्या दारापर्यंत येऊ लागली. तेव्हा-

राधाबाई- आता इकडे कशाला आणली आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा!
मुलगा- बाहेर कोठे जे? या स्टेशनावर आमची आगगाडी प्रवाशांचा फराळ होऊपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.