Last Modified: शनिवार, 28 फेब्रुवारी 2015 (17:27 IST)
दीड तिकीट
स्टॉपवरून बस सुटतासुटता दोघेजण घाईगर्दीने बसमध्ये चढले. कंडक्टर जवळ येताच त्यापैकी एकाने दीड दादर द्या असे म्हणत कंडटरकडे दहाची नोट दिली. तुम्ही तर दोघे दिसता. मग दीड तिकीट कसे मागता. कंडक्टरने विचारणा केली. हा माझा दोस्त अर्धवट आहे म्हणून त्याचे अर्धे तिकीट द्या. तिकीट घेणार्याने खुलासा केला. नाही, तरीही तुम्हास दोन तिकिटेच घ्यावी लागतील. कारण हा तुमचा मित्र अर्धवट असला तरी तुम्हीदेखील दीडशहाणे दिसताच की. कंडक्टरने चेहर्यावर खट्याळपणाचा आव आणत सांगितले. आणि दोन तिकिटे पंच करून त्याच्या हातात दिली.