1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

निसर्गोपचार केंद्र

निसर्गोपचार केंद्र जोक्स विनोद
शारिरीक लठ्ठपणा कमी करण्याचा कोणताच उपाय गावात राहून करता येण्यासारखा नव्हता म्हणून पत्नीने गावापासून खूप दूर असलेल्या निसर्गोपचार केंद्रात जाण्याची परवानगी पतीदेवांकडे मागितली.
निसर्गोपचार केंद्रात जाण्यासाठी जायचे म्हणजे अवाढव्या खर्च आलाच शिवाय पत्नीच्या गैरहजेरीत खाण्यापिण्याचेही हाल आलेच, तरीपण पत्नीची ब्याद दोन महिन्यांसाठी टळेल या आनंदात पतीने ताबडतोब तिला जाण्याची परवानगरी देऊन टाकली.
पत्नी रवाना झाली आणि पतीचे दोन महिने मोठ्या आनंदात पार पडले. अचानक एके दिवशी पत्नीचे एक पत्र आले. त्या पत्रात तिने म्हयले होते, 'गेल्या दोन महिन्यात माझे वजन निम्म्यावर येऊन ठेपले आहे. मी घरी परत येऊ काय?'
यावर पतीने ताबडतोब पत्राला उत्तर दिले. पत्रातला मचकूर असा होता- 'तू अजून दोन महिने तेथेच रहा. पुढचे पुढे पाहता येईल.'