नलिनी (अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत) हॅलो..... पोलीस स्टेशन? पो. इन्स्पेक्टर : हं, बोला काय प्रॉब्लम आहे? नलिनी: इन्स्पेक्टर साहेब, एक इसम चौदाव्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या दिशेने पाइपवरून चढत येतोय. मला खूप भीती वाटतेय हो! पो. इन्स्पेक्टर: बिलकूल घाबरू नका बाई तुम्ही. फक्त डोळे घट्ट मिटून घ्या. तोपर्यंत मी फायरब्रिगेडला फोन करतो. ते त्याला अगदी सुखरूप खाली उतरवतील. अजिबात काळजी करू नका!