करोडपती करोडीमलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्युपत्रात काय लिहिलं आहे हे ऐकण्यासाठी आतूर होऊन सर्व नातेवाईक एकत्र आले. वकिलांनी बंद लखोटा उघडला आणि त्यामध्ये जे लिहिलं होतं ते वाचायला सुरवात केली. त्यामध्ये लिहिलं होतं, ''माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणून मी शेवटता रुपयासुद्धा खर्च केलेला आहे!''