दहशतवादी बनण्यासाठी अनेकदा केवळ काही उद्दिष्टच समोर असावे लागते असे नाही. ग्रहांच्या एक विशिष्ट परिस्थितीही दहशतवादाकडे ढकलत असते. आपल्याकडे लहान मुल जास्त खोडकर असेल हा कोणत्या नक्षत्रात जन्माला आला असे म्हटले जाते. असे म्हणण्याची प्रथा उगाच पडलेली नाही. त्यामागेही काही कारणे आहेत.
तापट स्वभावाच्या व्यक्ती दहशतवादाकडे लवकर आकर्षित होतात. त्यांना कधी धर्माच्या नावावर दहशतवादी केले जाते. अशावेळी लग्न, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ट, नवम् आणि दशम भाव प्रमुख असतात. तसेच या ग्रहांमध्ये मंगळ, शनी, राहु, गुरु, शुक्र, सूर्य, केतू व चंद्र हे मुख्य ग्रह समजले जातात.
WD
जर लग्नेश अशुभ असेल तर व्यक्ती बिघडणार हे निश्चित. तृतीयस्थ भावात वरील ग्रह असतील तरीसुध्दा ही परिस्थिती कायम राहील. चतुर्थ भावात मंगळ उच्च असेल आणि शनीची द्दष्टी पडत असेल तरीसुध्दा ही परिस्थिती राहील.
मंगळ उर्जा, साहस तसेच युद्धाला प्रेरीत करणारा उग्र स्वभावाचा ग्रह आहे. शनीने मंगळाकडे पाहिल्यास स्फोटक परिस्थिती निर्माण होते. राहू खराब असल्यास मोठे विघ्न येते. गुरू धर्म, न्याय, संघटनक्षमता कारक असतो. परंतु, खराब असल्यास बुद्धिभ्रष्ट करतो. शुक्र धनसंचय वाढवितो तसेच अनैतिक पध्दतीने पैसे कमविण्यासाठीही प्रेरीत करतो. सूर्य उर्जा शक्ती वाढवितो तसचे आत्मकारकही असतो. चंद्र मनकारक आहे. हे सर्व लक्षात घेऊन कोण कोणत्या मार्गला प्रेरीत होत आहे, हे समजले जाऊ शकते.
WD
ग्रहाच्या दशांप्रमाणे व्यक्तींची पार्श्वभूमी काय आहे हेही महत्त्वाचे आहे. त्याच्या पार्श्वभूमीप्रमाणे त्याची वर्तणूक असते. लग्नात शनी खालचा असेल आणि तो मंगळाकडे पाहत असेल आणि राहू युक्त गुरुची द्दष्टी पडत असेल तर अशी व्यक्ती दहशतवादी बनू शकते. जर लग्नेश अशुभ असेल तर व्यक्ती बिघडणार हे निश्चित. तृतीयस्थ भावात वरील ग्रह असतील तरीसुध्दा ही परिस्थिती कायम राहील. चतुर्थ भावात मंगळ उच्च असेल आणि शनीची द्दष्टी पडत असेल तरीसुध्दा ही परिस्थिती राहील. पंचम भाव शत्रूचे असतील आणि या भावात शनी मंगळ असेल तर दहशतवादी बनवणारी परिस्थिती निर्माण होते. षष्ट भावात शनी मंगळ बरोबर असतील आणि लग्नेश अशुभ असेल तर व्यक्ती चुकीच्या मार्गाला जाईल. नवम भाव धर्माचा आहे. त्यात गुरू उच्च असेल, शनी मंगळ बरोबर असतील आणि लग्नेश बलवान असेल तर अशी व्यक्ती धर्माच्या नावावर चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. शनी मंगळ समसप्तक असेल तर युध्दजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दहशतवादी बनण्यासाठी त्याची कौटुंबिक परिस्थिती, सभोवतालचे वातावरण आणि शिक्षण यांचीही महत्वाची भूमिका असते. जसे आपले आचरण असते तसे आपले विचार असतात, हे महत्वाचे आहे.