1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
  6. हा आठवडा आणि तुमचे भविष्य!

Weekly Rashifal in Marathi | हा आठवडा आणि तुमचे भविष्य!

मे

WD

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा पवित्रा आक्रमक असेल. तत्त्वांशी तडजोड करणे मान्य होणार नाही. गरजू व्यक्तीला मात्र मदतीचा हात पुढे कराल. व्यापारात परिस्थिती बदलण्याची वाट न पहाता वेगाने हालचाल कराल. आर्थिक स्थिती सुधारण्याची लक्षणे दिसतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल किंवा बदली हवी असेल तर प्रयत्न करा. प्रवासाचे बेत ठरतील.

वृष

WD


व्यावहारीक आणि कौटुंबिक आघाडीवर कर्तव्यतत्परता अशी दोन रूपे तुमची असतील. धंद्यातील महत्त्वाची कामे उरकण्याचा प्रयत्न करा. उशीर झाला तर कामे रखडतील. अपेक्षित पैसे वेळेवर हातात न पडल्याने गैरसोय सहन करावी लागेल. शिलकीतल्या पैशांना हात लावावा लागेल. नोकरीत तुमचा उत्साह दांडगा असेल. घरामधे धार्मिक विधी ठरण्याची शक्यता आहे.

मिथु

WD


परस्परविरोधी ग्रहमान आहे. हातात पैसे पडल्याचा आनंद मिळतो तोच न टाळता येणारे खर्च पुढे ठाकतील. त्यामुळे थोडे वाईट वाटेल. व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण उंचावत राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी देणी देणे याला प्राधान्य द्या. नोकरीत चांगल्या कामगिरीकरता किंवा प्रशिक्षणासाठी निवड होईल. घरामधे तीर्थक्षेत्री प्रवासाचे बेत ठरतील. सत्संगतीचा लाभ होईल.

कर्क

WD


तुमच्या स्वभावातील विविध पैलू सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येतील. व्यक्तीगत जीवनात कर्तव्यपूर्ती झाल्याने तुम्ही समाधानी असाल. त्यामुळे स्वत:च्या आवडीनिवडी जपण्याकडे कल राहील. सामाजिक कार्यात विशेष रस वाटेल. व्यापारात साहसी पण सावधतेने घेतलेला पवित्रा चांगले फळ देईल. नोकरीत मनातील इच्छा पूर्ण करणारी संधी मिळेल. धार्मिकस्थळाला भेट देण्याची कल्पना साकार होईल.

सिं

WD


पूर्वी आलेले दडपण संपल्याने तुम्ही पुन्हा उत्साही दिसाल. व्यापारात मोठे काम हाताशी आल्याने तुमच्यातील विचार आणि कृतीला चालना मिळेल. आवश्यक त्या व्यक्तींशी साथ मिळेल. आर्थिकस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बदली किंवा कामाच्या स्वरूपात बदल करण्यासाठी प्रयत्न करा. घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.

कन्या

WD


तुम्ही जरी उत्साही असलात तरी सभोवतालच्या व्यक्तींकडून सहकार्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. व्यापारात तुमच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाच्या कामे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. उधारीपेक्षा रोखीचे व्यवहार हाताळा. हातातील पैशांचा काटकसरीने वापर करा. नोकरीत वरिष्ठांनी दिलेले आश्वासन काही कारणाने प्रलंबित होईल. कामाच्या धावपळीत प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळविणे महत्त्वाचे आहे.

तूळ

WD


प्रयत्नांच्या प्रमाणात यश आहे. त्यामुळे मेहनत वाढवणे गरजेचे आहे. तुमचे अचूक अंदाज काही प्रमाणात साथ देतील. व्यवसाय उद्योगात नेहमीच्या पद्धतीने फारसा फायदा होत नाही म्हणून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. स्पर्धकांवर मात करण्याची संधी चालून येईल. नोकरीत सहकाऱ्यांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. सत्संगतीचा आनंद मिळेल.

वृश्चि