1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013

हा आठवडा आणि तुमचे भविष्य

मेष

WD

अवघड प्रश्न सोडवता येणार नाही, परंतु चतुर्थात गुरू, अष्टमांतील शनी राहू यांचा प्रतिष्ठेवरील आक्रमणाचा मार्ग बंद करता येईल. गुरुवारच्या बुध हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित निर्माण होणारे काही प्रसंग परिवारातील प्रश्न सोडवतील. त्याचे परिणाम व्यापारी प्रगती, अर्थप्राप्ती, समाजकार्यातील यश, कला करार यांवर होतील. त्यातून नियमित उपक्रम व्यवस्थित सुरू ठेवता येतील. बाजार आणि प्रतिष्ठितांच्या संपर्कात त्यामुळे राहाता येईल.

वृष

WD

व्यवहारांची माहिती, महत्त्वाची कागदपत्रे षष्ठात शनी राहू असल्याने जाहीर करू नका. शत्रूंपासून दूर ठेवा. यामधून प्राप्ती ते प्रतिष्ठा यामधील प्रश्न वेगाने सोडवता येतील. अचानक मंगलकार्य ठरावे. गुरू हर्षल केंद्रयोगातील चमत्कारिक प्रतिक्रियांनी विचलित होऊन कार्यमार्ग बदलण्याची आवश्यकता नाही. नोकरी उद्योगाचे नवे वेळापत्रक तयार होईल. पैसा मिळेल, नवे परिचय, नव्या उपक्रमांत उपयुक्त ठरतील.

मिथु

WD

राजकारण, शिक्षण, कला प्रांत, व्यापारी सौदे, दूरचे प्रवास, महत्त्वाचे करार यांचा समावेश त्यात करता येतो. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. काही प्रांतातील प्रभाव प्रगतीच्या नव्या प्रवासाला उपयुक्त ठरू शकतो. पराक्रमी शुक्र कला संगीतात उत्साहाचा आहे. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. रवी हर्षल नवपंचम योगामुळे अवघड प्रकरण मार्गी लावता येतात. परंतु विचार ते कृती यांना प्रलोभनापासून मात्र दूर ठेवा.

कर्क

WD

सिंह, सूर्य, पराक्रमी शुक्र व्यावहारिक उलाढालींना इभ्रत सांभाळणारी शक्ती देणार असल्याने बारावा गुरू, चतुर्थात शनी राहू यांच्यातील उपद्रवांची तीव्रता संकटाची ठरू शकणार नाही. गुरू हर्षल केंद्र योगातील चमत्कारिक प्रसंग, प्रार्थना आणि प्रेरणा यामधून नियंत्रणात ठेवता येतील. अर्थप्राप्ती, सामाजिक उपक्रम, अधिकारातील शक्ती, नवे करार यांचा समावेश त्यात राहील. शेती चांगली होईल.

सिं

WD

साडेसाती आणि व्ययस्थानी रवी या काळांत अधिकार आणि अर्थप्राप्तीने प्रश्न निर्माण होतात. आर्थिक नियोजनात व्ययस्थानातील रवी बुध व्यत्यय आणतात. सावध राहा. व्यत्यय प्रबल करू नका. नोकरी, धंदा, कला प्रांत, सामाजिक कार्ये यामध्ये प्रतिमा उजळत राहणारी आहे. शेती संशोधन त्यात महत्त्वाचे ठरू शकते. सतर्क राहून उलाढाल सुरू ठेवा.

कन्या

WD

लाभांत गुरू, पराक्रमी शनी राहू, मंगळवारी राशीस्थानी येत असलेला बुध कार्यप्रांतात उत्साह राहील. मिळणाऱ्या यशातून नवीन उपक्रमांचा शोध घेतला जाईल. संपर्क, चर्चा यांचा त्यासाठी उपयोग होईल. आर्थिक घडी बसेल. प्रवास होतील. शेतीत यश मिळेल. अधिकार वाढतील. व्यापारी निर्णय अचूक ठरतील. श्रीमारुतीची उपासना, आराधना उपक्रमांत निर्विघ्नता देऊ शकेल.

तू

WD

संरक्षण व्यवस्था याच काळात मजबूत करणे योग्य ठरते. रविवारच्या रवी हर्षल नवपंचम योगातून तूळ व्यक्तींच्या संपर्क सफल योजना, परदेशात पोहचणे शक्य आहे. भक्तिमार्गातूनही आनंद मिळेल. संधी, मध्यस्थी, योग्य प्रसंग यांचा उपयोग करा. नारळीपौर्णिमेच्या आसपासचा काळ महत्त्वाचा ठरेल. अधिकार वाढतील. पैसा मिळेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आरोग्यावर औषध सापडेल. शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. श्रीमारुतीची उपासना, आराधना ठेवा.

वृश्‍चिक