मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2014
Written By
Last Modified: लातूर , शनिवार, 8 नोव्हेंबर 2014 (12:33 IST)

2015 मध्ये विवाहाचे 54 शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार सन 2015 या नवीन वर्षात विवाहाचे 54 शुभ मुहूर्त असले तरी मागील वर्षापेक्षा आठ टक्क्यांनी हे मुहूर्त कमी झाले आहेत. सर्वाधिक विवाहाचे 12 मुहूर्त फेब्रुवारी 2015 मध्ये आहेत.
 
3 नोव्हेंबरला देवशयनी आषाढी एकादशीनंतर विवाहासह सर्व शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या विवाह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 2014च्या नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे 17, 19, 24, 26 व 27 या तारखांना तर डिसेंबर महिन्यात विवाहाचे 1, 7 व 8 शुभ मुहूर्त आहेत. विविध पंचांगानुसार वर्ष 2015 गोपाळ व गोरज असे एकूण 54 विवाहांचे शुभ मुहूर्त आहेत. या मुहूर्तांची संख्या गणनेनुसार कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ष 2010 नंतर विवाह मुहूर्त कमी होत आहेत. यात 2010मध्ये 90 मुहूर्त, 2011मध्ये 61 मुहूर्त, 2012 मध्ये 71, 2013मध्ये 65 तर 2014मध्ये 57 व 2015 मध्ये 54 शुभ मुहूर्त आहेत.

सन 2015च्या शुभ मुहूर्तांमध्ये जानेवारी महिन्यात 16, 18, 24, 25, 29,
फेब्रुवारीमध्ये 5 ते 17, 
मार्चमध्ये 4, 8 तसेच 9 ते 12   
एप्रिलमध्ये 21, 22, 27, 28, 30
मे महिन्यात 1, 5, 7, 8, 9, 14, 19, 20, 27, 28 व 30  
जून महिन्यात 2, 4, 5, 6, 10 व 11
नोव्हेंबरमध्ये 22, 26 व 27
डिसेंबर महिन्यात 4 व नंतर 13 व 14 या दिवसांना शुभ मुहूर्त आहेत. 
 
14 डिसेंबर 2014 ते 14 जानेवारी 2015पर्यंत कोणत्याही कार्याकरिता शुभ मुहूर्त नाही. विवाहाचे मुहूर्त 8 डिसेंबरपर्यंत राहणार आहेत. मात्र, 14 डिसेंबरपासून सूर्य धनु राशीत जाणार असल्यामुळे शुभ कार्य होणार नाहीत. वर्ष 2015 मध्ये जुलै ते ऑक्टोबरपर्यंत शुक्र अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त कमी आहेत. सन 2010 ते 2014 पर्यंतच्या शुभ मुहूर्तांपैकी सन 2015च्या शुभ मुहूर्तांच्या तारखा कमी असल्याने आतापासून विवाह जुळवणीसाठी लगीनघाई दिसत आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.