1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
  6. जानेवारी 2014 मधील भविष्यफल

Monthly Rashifal of January 2014 | जानेवारी 2014 मधील भविष्यफल

मेष

WD
नवीन वर्षाच्या नवीन महिन्यात योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. या महिन्यात आरोग्य चांगले राहील. नव्याने काम करण्यासाठी उत्तम काळ. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. आरोग्य नरम-गरम राहील. देवाण-घेवाण टाळा.

पुढे पहा वृषभ राशीच्या जातकांचे भविष्यफल...


वृषभ

WD

या महिन्यात पंचमातील मंगळामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल पण नव्या वर्षाची सुरुवात खूपच चांगल्या गोष्टींनी होणार आहे. नवीन परिचय होतील. त्यातून मैत्रीचे रूपांतर नाजूक प्रेमात होईल आणि वैवाहिक गोष्टींना पोषक ठरणारे वातावरण निर्माण होईल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांनी होकेखोर वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. नवीन योजनांना गती येईल.

पुढे पहा मिथुन राशीच्या लोकांचे भविष्यफल....


मिथुन

WD

या महिन्यात घरात मंगलकार्ये ठरतील. उद्योग-धंद्यात यश लाभेल. तुमचा उत्साह व जोम सळसळता राहील. त्यामुळे कामाचा झपाटा वाखाणण्यासारखा असेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. या महिन्यात अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

पुढे पहा कर्क राशीच्या जातकांचे भविष्यफल...


कर्क

WD


हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.

पुढे पहा सिंह राशीच्या जातकांचे भविष्यफल...


सिंह

WD

या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील.

पुढे पहा कन्या राशीच्या जातकांचे भविष्यफल...


कन्य

WD

जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल.

पुढे पहा तूळ राशीच्या जातकांचे भविष्यफल...


तूळ

WD

अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे.

पुढे पहा वृश्चिक राशीच्या जातकांचे भविष्यफल...


वृश्चिक