रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

निकाल सुधारेल

मुख्याध्यापक: शिक्षक बंधूंनो! आपल्या शाळेतील शिक्षक हरिभाऊ निवडणुकीकरता उभे आहेत.
आपण सगळ्यांनी त्यांना मत द्यायचे आहे, एवढेच नव्हे तर त्यांचा प्रत्येक शाळेत जाऊन हिरीरीने प्रचार करायचा आणि त्यांना निवडून आणून विधान परिषदेत पाठवून द्यायचे आहे.
एक शिक्षक: सर! पर त्यामुळे आपल्या शाळेचा काय फायदा होईल?
मुख्याध्यापक: त्यामुळे आपल्या शाळेचा निकाल सुधारेल.