गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

मारकुटे शिक्षक

एक शिक्षक खूपच मारकुटे होते. त्यांची विद्यार्थीवर्गात प्रचंड दहशत पसरलेली होती. एकदा ते शिक्षनदीवर पोहायला गेले आणि पोहताना दमछाक झाल्यामुळे वाहून जाऊ लागले. जिवाच्या आकांताने ओरडू लागले, 'वाचवा, वाचवा'.
काठावर त्यांचा विद्यार्थी होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. तो चांगला पोहणारा होता. त्याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि मोठ्या शर्तीने त्यांना वाचवले.
त्याच्या साहसामुळे खूश झालेले शिक्षक त्याला म्हणाले, 'बाळा! तू फार मोठं जीवावरचं साहस दाखवून माझा जीव वाचवलास. बोल, मी तुझ्याकरिता काय करू? '
मुलगा म्हणाला, 'सर! तुम्ही माझ्याकरिता एवढेच करा की, मी तुम्हाला बुडताना वाचवलं, हे शाळेकोणत्याही विद्यार्थ्याला कळू देऊ नका.'