- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
ऊन
फार दिवसांनी आले दारी माझ्या ऊनकोंदलेल्या आभाळाचे लख्ख झाले मन-फारा दिवसांनी आली दारात किरणेटुडटुडणारी जशी नाजूक पावले-ऊन येते मांजराच्या चोर पावलांनीबाळ लागे धरू त्याला इवल्या हातांनी -कोवळ्याशा उन्हामध्ये हुंदडती बाळेहसताना चमकल फुलांचेही डोळे -अंगाअंगातून वाजे सतारीचे बोलआनंद तरंग किती उमटती खोल - -
अंजली