गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By वेबदुनिया|

माझं गाव

- महादेव कोरे

गावकडं कलं कि, 
गाव सुटत नाही
ऋणानुबंधाची कधी
नाळ तूटत नाही

गाव सोडताना
जीवात घालमेल होते
पोटासाठी इतके आम्ही
का झालो पोरके

गाव कसही असो
स्वाभिमान असतो मनात
सुखसोई कितीही असोत
मन लागत नाही शहरात.