1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित

बिस्किटांची गंमत

- सौ. उर्मिला भावे, पुणे

WD
एकदा एक बिस्किट
दुधात पडलं
दूध होत गरम त्याचं अंग भाजलं
मुन्ना लागला काढायला
त्याचं बोट भाजलं
आईने घेतला चमचा
त्याला बाहेर काढलं
त्यावर फुंगर मारुन
बाळाला भरवलं
मुन्ना बाळ खुदकन् हसले
त्याचे हसे पाहून, आईचे पोट भरले.

साभार : वार्षिक अनुपुष्प दिवाळी विशेषांक 08
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा