शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (17:32 IST)

भाऊबीज कथा Bhai Dooj Pauranik Katha

bhaidooz
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि पाच दिवसीय सणामध्ये भाऊबीजच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. भाऊबीजला यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित एक सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला दुसरा सण आहे.
 
कसा साजरा करावा - या दिवशी विवाहित बहिणी भावाला आपल्या घरी भोजनासाठी बोलवतात आणि भावाला प्रेमाने भोजन देतात. बहीण आपल्या भावाला टिळक लावते आणि भाऊ भेटवस्तू देऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. 
 
भाऊबीज कथा
सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे. पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे. एकदा कातिर्क द्वितीया यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदित झाली. तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केले आणि भोजन वाढले.
 
यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल आणि तिलक करेल त्यांना आपला भय नसावा.
 
तथास्तु म्हणत यमराज यमपुरीला गेले. असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तीभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणींचे आदरातिथ्य स्वीकारतात, त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाचे भय नसते.