लहानगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे त्याला उमगले. माधवने बाईंना विचारले, ध्रुव किती मोठा होता? बाई उत्तरल्या, तुमच्या वयाचा होता. माधवचे विचारचक्र सुरू झाले. मला देव दिसेल कां? पण रान कसे असते? शाळेतील एका मोठ्या मुलाने...