मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025 (20:30 IST)

नैतिक कथा : अस्वल आणि माळी

kids story
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलात एका माळीला एका एकाकी अस्वलाला भेटला. व ते मित्र बनले आणि एकत्र आनंदाने राहू आगळे. आता दोघांच्या छान गप्पा रंगल्या पण आता माळीला खूप झोप यायला लागली.
माळीने त्याच्याकडे फक्त एकच विनंती केली. तो झोपत असताना त्याच्या चेहऱ्यावरून माश्या दूर ठेवशील. आता माळी शांत झोपला. एक माशी माळीच्या चेहऱ्यावर आली. व अस्वलाची नजर तिच्यावर गेली. अस्वल माशीला हकलवून लावू लागले पण माशी कशी जाईना.
जेव्हा अस्वल माशीला हाकलून लावू शकला नाही, तेव्हा त्याने तिला मारण्यासाठी दगड फेकला, पण तो दगड  माळीला लागला व माळी मृत्युमुखी पडला. त्याने अस्वलावर ठेवलेल्या विश्वासाची त्याला खूप मोठी किमंत मोजावी लागली.
तात्पर्य : मूर्ख मित्रांपेक्षा पेक्षा मित्र नसणे चांगले.
Edited By- Dhanashri Naik