पौराणिक कथा : गणेश आणि कार्तिकेयची कहाणी
Kids story : भगवान शिव यांचे कुटुंब एकदा कैलासावर बसले होते. शिव आणि पार्वती यांनी आपल्या मुलांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तसेच शिव आणि पार्वती यांनी ठरवले की जो कोणी प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल तोच सर्वश्रेष्ठ ठरेल.
भगवान कार्तिकेय त्यांचे वाहन मोरावर स्वार होऊन जलद गतीने निघाले. तर गणेश काही वेळ थांबले. व उंदरावर स्वार झाले. आपला भाऊ वेगवान आहे हे लक्षात घेऊन गणेशाने हुशारीने वागले आणि आपल्या पालकांना तीन वेळा प्रदक्षिणा घातली व नमस्कर करून भाऊ कार्तिकेय यांची वाट पाहू लागले.
आता कार्तिकेय आले आणि म्हटले की मी आलो प्रथ्वीप्रदक्षणा करून. पण तू एवढ्या लवकर कसाकाय आलास. यावर गणेश म्हणाले मी आधीच पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आहे कार्तिकेय म्हणाले कस काय?, त्यावर गणेश म्हणाले मी आपल्या माता आणि पित्याला प्रदक्षिणा घातली कारण कारण त्याच्यासाठी ते संपूर्ण जग आहे. यावर शिव आणि पार्वतीने गणेशाचे कौतुक केले.
Edited By- Dhanashri Naik