Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हत्ती आणि शिंपीची गोष्ट

Updated: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:24 IST)
 
हत्तीचे पिलू त्या शिंप्याचे फार आवडीचे होते. दोघांची चांगली गट्टी जमली होती. त्या गावात एक देऊळ होत. दररोज तो हत्ती डोलत डोलत त्या शिंपीकडे यायचा, तो शिंपी त्याला फुले द्यायचा आणि ते फुले घेऊन तो हत्ती त्या देऊळात जाऊन देवाला व्हायचा. हा असा दररोजचा नित्यक्रम होता. लोक मोठ्या कौतुकाने हत्तीची देवावरची भक्ती बघायचे. तो शिंपी कडे यायचा आणि फुले घेऊन परत जायचा. 
 
एके दिवशी तो शिंपी फार तणावात असतो. दिल्या वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून त्याचे भांडण एका ग्राहकाशी झालेले असते. त्यामुळे तो फार संतापलेला असतो. ठरलेल्या प्रमाणे तो हत्ती त्या शिंप्या कडे येतो आणि फुले घेण्यासाठी आपली सोंड शिंप्या जवळ करतो. संतापलेला शिंपी हत्तीला फुले देण्यावजी त्याचा सोंडेला सुई टोचतो आणि आपला राग त्या हत्तीवर काढतो. जोरात सुई टोचल्यामुळे हत्तीला फार वाईट वाटतं तो त्यावेळी तर काही करत नाही पण आतून तो फार दुखावलेला असतो. 
 
आपल्याला दिलेली वागणुकीचा धडा शिंप्याला कसा शिकवायचा ह्याचा विचार करत असतो. त्याला देखील शिंप्याचा फार राग आलेला असतो. तो स्वतःचा राग शांत करण्यासाठी गावच्या जवळ एक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये जाऊन लोळ लोळ लोळतो त्याचे पाणी अंगावर घेऊन आपला राग शांत करतो आणि त्या ओढ्यातले पाणी चिखला सकट आपल्या सोंडेत भरून गावाच्या दिशेने शिंप्याकडे निघतो. शिंपी आपले काम करत असतो. काहीही न बोलता तो हत्ती त्या शिंप्यावर आणलेले घाण पाणी टाकतो. त्याचे सगळे कपडे आणि दुकानाचे सामान खराब होतं. त्याला स्वतःची केलेली चूक लक्षात येते. पण आता पश्चात्ताप करून काय होणार. त्याला त्याचा चुकीसाठी चांगलीच शिक्षा मोजावी लागली होती.

अशा प्रकारे हत्तीने काहीही न बोलता शिंपिला चांगलाच धडा शिकवून दिला होता. आणि शिंप्याला देखील आपली चूक कळाली होती. ह्याला म्हणतात जशास तसे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Alpine Divorce म्हणजे काय? पार्टनरला ट्रेकिंगमध्ये एकटं सोडण्याचा हा नवा ट्रेंड का चर्चेत?

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Cheese Schezwan Dosa लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता चीज शेझवान डोसा

ओठांवर दिसणारी ही लक्षणे असू शकतात कर्करोगाची संकेतस्थळे; वेळीच ओळखा, दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments