शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (15:46 IST)

श्री गणेश आणि हरवलेल्या शंखाची गोष्ट

ganesh
ही एक अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा भगवान विष्णूंना देखील श्री गणेश यांना बुद्धिमान म्हणून हे उपाधी द्यावी लागली होती. 
 
भगवान विष्णू यांच्याजवळ एक शंख होता. ज्याला ते नेहमी जवळ ठेवायचे. एक दिवस त्यांनी पहिले की शंख गायब झाला आहे व तो कुठेही भेटत नाही आहे. यामुळे ते नाराज झाले व त्यांनी शंख शोधण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. 
 
भगवान विष्णू शंख शोधत होते. तेव्हा भगवान विष्णूंना अचानक दुरून शंखनाद ऐकू आला. त्यांनी त्या दिशेला शोधायला सुरवात केली. व त्यांना जाणीव झाली की हा ध्वनी कैलास पर्वतावरून ऐकाला येत आहे. जेव्हा ते कैलाशवर पोहचले आणि त्यांनी पाहिले की शंख तर गणेशजींजवळ आहे. व ते शंख वाजवण्यात गुंग आहे. तसेच गणेश लवकर हार मानणार नाही हे जाणून त्यांनी भगवान शंकरांचा शोध घेतला आणि गणेशाला शंख परत करण्याची विनंती करण्यास सांगितले.
 
तसेच भगवान शंकर म्हणाले की गणेशाची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती देखील त्याच्यात नाही आणि त्याला प्रसन्न करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची पूजा करणे. म्हणून भगवान विष्णूने तेच केले. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी तयार केले आणि मनातल्या मनात गणेशाची पूजा केली. हे पाहून गणेशाला खूप आनंद झाला आणि त्याने विष्णूचा शंख त्यांना परत केला.
 
तात्पर्य : ही कथा आपल्याला नम्रता शिकवते, हे दर्शविते की भगवान विष्णूसारख्या महान देवाने गणेशाची उपासना करण्यास संकोच केली नाही.

Edited By- Dhanashri Naik