1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा

कॉमन रोज : फुल पाखरांची दुनिया

WD
द कॉमन रोज या फुलपाखराची विस्तृत प्रमाणात वर्गवारी केली जाते व ही फुलपाखरे आशिया खंडाच्या भागात आढळतात. स्वालोटेल फुलपाखरे जास्त करून बगीच्यात बागडतात व ते भारतात सर्वत्र आढळून येतात. ते उंच उडतात व उंचीवर उगवणार्‍या फुलावर बसून त्यातील मधुर रस शोषण करतात. फुलपाखराची अंड्यातून नेमकीच बाहेर पडलेली पिल्ले विषारी लतावेली तसेत अॅरिस्टोलोशिया जातीच्या वेलींमधील विषारी रस पितात. हे विषारी द्रव्य त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांच्या शरीरात साठवून ठेवल्या जाते. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे शरीर विषारी बनते व त्यास परभक्ष्यक प्राणी किंवा पक्षी खाऊ शकत नाही. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांचे उड्डाण हळू असूनही त्यावर परभक्ष्यी हल्ला करीत नाहीत. त्यांचे वरचे शरीर काळे शेपटीकडील भाग फिकट व त्यावर पांढरे काळे ‍पट्टे असतात.

शेपटीकडील भागावर पांढर्‍या रंगाचे 5 पट्टे असतात. शरीर लाल रंगाचे असून, त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. मादी फुलपाखरू थोडे फिक्या रंगाचे असून, तिचे पंख रुंद असतात. ही मादी कमन मॉरमॉन, पॅपिलीओ पॉलीट्‍स, रोज विंडमील, पॅचिलोप्टा लॅट्रीली या जातीतील मादीसारखी दिसते. कॉमनरोज फुलपाखराचे पंख 80 ते 100 मिमी रुंद असतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा