1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा

ब्राह्मणाचे स्वप्न

WD
एका गावात एक ब्राह्मण होता. तो कंजूष असल्याने भिक्षुकीतून आलेले धान्य मडक्यात ठेवून ते मडके छताला अडकवून ठेवी. त्या मडक्याच्या खालीच तो पलंगावर झोपत होता.

असाच एख दिवस झोपला असताना मनोराज्य करण्यास ब्राह्मण सुरुवात करतो, ''थोड्याच दिवसात हा घडा तांदळाने भरेल..... अशा तर्‍हेने माझ्याकडे भरपूर धान्य जमा होईल. मग दुष्काळ पडला की ते जास्त भावाने विकून पैसा कमवीन. आलेल्या पैशातून शेळ्या घेईन. नंतर त्या शेळ्यांचा सहा महिन्यांनी कळप झाला की तो कळप विकून गाई म्हशी विकत घेईन. नंतर त्या विकून घोडे विकत घेईन. त्यांच्यासाठी मोठी पागा झाली की ती विकून मी लक्षाधीश होईन. मग एखाद्या श्रीमंताची सुंदर मुलगी असेल तिच्याशी माझे लग्न होईल. आम्हाला छानसा मुलगा होईल. तो मुलगा खेळता खेळता घोड्याजवळ जाईल. त्यावेळी मी बायकोला ओरडेन, पण ती कामात असल्याने मुलाला पटकन उचलू शकणार नाही. त्यामुळे मी तिला रागाने लाथ मारीन.'' असे स्वप्नात बडबडताना ब्राह्मण खरंच लाथ मारतो ती वर टांगलेल्या घड्यावर लागते, त्यामुळे घडा वरून खाली पडतो आणि धान्य विखरते.

तात्पर्य : मनोराज्ये करण्यापेक्षा कृती करणे आवश्यक असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा