शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : शनिवार, 6 एप्रिल 2024 (16:43 IST)

बनावट तांदूळ असे ओळखावे

आजकाल बाजारामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये भेसळ केली जाते आहे. तसेच खायच्या पदार्थांमध्ये देखील भेसळ केली जाते. ज्यांना लोक बाजारातून विकत आणतात आणि त्यांची गुणवत्ता न बघता सेवन करतात. या प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. दुधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य भेसळ आहे, पण जे तांदूळ आपल्या स्वयंपाकघरात रोज शिजतात त्याचा भात घरातील सदस्य आवडीने खातात. तो देखील बनावट असू शकतो. काही दिवसांपासून बाजारामध्ये बनावट तांदूळ विकले जात आहेत. लोकांना माहित देखील नसेल की जे तांदूळ ते खात आहे ते प्लास्टिकचे देखील असू शकतात. हे कसे ओळखावे या करीत या काही टिप्स जाणून घ्या. घरीच तुम्ही खरे आणि बनावट तांदूळ ओळखू शकतात. 
 
बाजारातून आणलेल्या तांदुळाची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी थोडेसे तांदूळ घेऊन ते जाळून पाहावे. जर तांदूळ जाळल्यानंतर प्लॅस्टिकचा वास येत असेल तर समजून जा की ते नकली तांदूळ आहेत. 
 
तांदूळ चांगले आहेत की नकली आहे हे तपासून पाहण्यासाठी एक चमचा तांदूळ एक ग्लास पाण्यात टाकावे. जर तांदूळ पाण्यात बुडालेत तर ते चांगले तांदूळ आहे. जर तांदुळ पाण्यावर तरंगत असतील तर ते प्लास्टिकचे आहेत. 
 
थोडेसे तांदूळ एका बाऊलमध्ये घ्या. चूना आणि पाण्याचा घोळ तयार करा. या घोळमध्ये तांदूळ काही वेळपर्यंत भिजवून ठेवा. जर तांदुळाचा रंग बदलत असेल तर समजून जा की ते तांदूळ बनावट आहेत.
 
तांदूळ चांगले आहेत की प्लास्टिकचे हे तपासण्यासाठी तुम्ही गरम तेलाचा देखील उपयोग करू शकतात. गरम तेलात एक मूठभर तांदूळ टाकावे. जर तांदूळ वितळून एकमेकांना चिटकायला लागले तर समजून घ्या की ते प्लास्टिकचे तांदूळ आहे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik