बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

नातं टिकवण्यासाठी हे करा...

नाती रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक असतात. पण ती कितीही लवचीक असली तरी एक वळण असंही येतं की नात्याचं ओझं व्हायला लागतं. हे ओझं सांभाळण्यापेक्षा उतरून ठेवण्याकडे सध्या अनेकांचा कल दिसून येतो. खरं तर नात्यात वितुष्टपणा येतो तेव्हा कोणा एकाचा दोष नसतो, तर दोघंही त्याला समप्रमाणात जबाबदार असतात, म्हणून नातं आयुष्यभर टिकवायचं असेल तर काही बाबींचा विचार करायला हवा. 
 
* नात्याला नाव न देणं ही आजकालची फॅशन बनत आहे. अनेक जोडपी बराच वेळ एकत्र घालवतात तरीही नात्याला विशिष्ट नाव देण्याची त्यांना भिती वाटते. ही संदिग्धता त्या नात्याचं आयुष्य कमी करू शकते. 
 
* सध्या डेटिंगचा ट्रेंड आहे. आपण अमुक एका व्यक्तीला डेट करतो असं सांगणं स्टाइल स्टेटमेंट बनत आहे. पण डेटिंग करण्यापूर्वी दोघांनी या नात्याची खातरजमा करणं गरजेचं आहे. टाईमपास म्हणून डेटिंग करू नये. एखाद्या नात्यामध्ये दोन व्यक्तींचं समर्पण तितकंच महत्त्वाचं असतं. 
 
* कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांसाठी जगणं गरजेचं असतंच पण त्याहूनही गरजेचं असतं ते एकमेकांना स्पेस देणं. एकमेकांना दिलेली स्पेस नात्यामध्ये खेळकरपणा आणण्यास सहाय्यभूत ठरेल.