शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (23:13 IST)

Tips of Lovers : प्रियकर/प्रेयसीसाठी खास सल्ला!

तुम्हाला मिळेल तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी, त्यासाठी चंद्र तोडून आणू नका, तिची सॅंण्डल किंवा तिच्या भावाचा मारही खाऊ नका. करा फक्त इतकंच:-
१. प्रेमसंबंधात बाधा असेल तर सफेद कागदावर सहा वेळा आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीचे नाव लिहून लाल रंगाच्या क्रिस्टल बॉलमध्ये लपेटून पिरॅमिडच्या खाली ठेवा. रोज पहाटे या बॉक्सला हाताच्या मुठीत झाकून मनातील इच्छा व्यक्त करा.
२. एका कागदावर लाल रंगाने स्वतचे नाव लिहून तुळशीच्या कुंडीच्या खाली हा कागद ठेवा. आपला प्रियकर किंवा प्रेयसी यांची ओळख होईल.
३. प्रेमसंबंधात यशस्वी होण्याकरता घराच्या दक्षिण पश्चिम भागात सात क्रिस्टल बॉल लाल धाग्यात लटकवा.
४. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याचा फोटो घराच्या उत्तर पश्चिम भिंतीवर लावा.
५. घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला लव्हबर्डस ठेवा.
६. प्रेमसंबंधात तणाव असेल तर सात अगरबत्या पेटवून त्या घडय़ाळ्याच्या काटय़ाच्या उलटय़ा दिशेने फिरवाव्यात.
७. प्रेमसंबंध तुटले असतील आणि ते तुम्हाला पुन्हा पूर्ववत करावयाचे असल्यास पाच बाय पाच इंच आकाराच्या कागदाच्या तुकडय़ावर लाल रंगाच्या शाईने सहावेळा संबंधित व्यक्तीचे नाव लिहा. आणि त्याची घडी करून तो कागद मातीत दाबून ठेवा. संबंध पूर्ववत होतील.
९. शिव गौरी यंत्राच्या प्राणप्रतिष्ठेसमवेत कामदेव यंत्राची पूजा केल्यास प्रेमसंबंधात लाभ होतात.
१०. घरातील दक्षिण पश्चिम भागात विण्ड चाइम्स लटकवा.
११. रूममध्ये लाल रंगाचे गुलाब ठेवा.
१२. महादेवाच्या पिंडीवर लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक करा.
१३. बेडरूम मध्ये सात बासऱ्या ठेवाव्यात. संबंध चांगले होतात.
१४. बेडरूमच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या भिंतीवर दोघांचा हसरा फोटो लावावा संबंध घट्ट होतात.