शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (15:04 IST)

विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला

anil deshmukh
विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याशिवाय देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.
अपूर्ण आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप
सीबीआयने 60 दिवसांच्या अनिवार्य कालावधीत आरोपपत्र दाखल केले नाही आणि नंतर सीबीआयने अपूर्ण आरोपपत्र दाखल केले या कारणास्तव या तिघांनी न्यायलयाकडे जामीन मागितला होता. तसेच सीबीआयने आरोपपत्रासह संबंधित कागदपत्रे सादर केली नसून ती निर्धारित मुदतीनंतर सादर करण्यात आली, असा युक्तिवादही अनिल देशमुखांच्या वकिलांनी केला होता.