ganesh chaturthi
✕

महिलांना रिलेशनशिपमध्ये काय हवं असतं?

Updated: मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (12:56 IST)
 
त्यांना स्वातंत्र्य हवं असतं : सक्षम महिलांना नात्यात असताना किंवा प्रेमात असताना त्यांची ओळख गमवायची नसते. त्यांच्या पार्टनरने त्यांना बदलावं असं त्यांना वाटत नसतं. त्याऐवजी ती आहे तशी तिला स्वीकारावे असं त्यांना वाटत असतं. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीसाठी वेळ द्यायचा असतो, मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं, बाहेर जायचं असतं. त्यांना त्यांच्या पार्टनरला लाइफचं सेंटर करायचं नसतं. केवळ नात्यात अडकून पडायचं नसतं. पार्टनरलाच विश्व बनवायचं नसतं. 
 
पार्टनरने प्रामाणिक असावं : या महिला स्वतःही काही खोटं बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा असते की, त्यांच्या पार्टनरनेही प्रामाणिक राहावं. पार्टनरने याबाबत प्रामाणिक राहावे की, त्याला या रिलेशनशिपमधून काय हवंय. हे त्याला क्लिअर असावे नाही तर या नात्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. 
त्याने विश्र्वास ठेवावा : ती प्रामाणिक, विश्र्वासू आणि जबाबदार आहे. त्यामुळे तिला तिच्या पार्टनरने विश्र्वासू आणि प्रामाणिक असणे अपेक्षित असतं. तिला असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरला हे कळावं की, तिच्याकडे स्वतःचं लाइफ हॅन्डल करण्याची क्षमता आहे. 
 
पार्टनरचा वेळ हवा, गिफ्ट नकोत : अर्थातच महिलांना त्यांच्या पार्टनरने दिलेले गिफ्ट्‌स आवडतात. पण सक्षम महिलांना हेही माहीत असतं की, पार्टनरच्या वेळेला गिफ्ट हा पर्याय नाहीये. गिफ्ट देण्यापेक्षा तिला पार्टनरने सोबत असावं असं वाटत असतं. 
 
सन्मान हवा असतो : जर पार्टनरने तिला सन्मान दिला नाही किंवा तशी वागणूक दिली नाही तर याचा अर्थ त्याचं तिच्यावर प्रेमच नाही. हे तिला माहीत असतं त्यामुळे तिला वाटत पार्टनरने तिच्या विचारांचा, शरीराचा, आवडी-निवडीचा आणि मतांचा आदर करावा. 
 
खरी जवळीकता समजावी : सक्षम महिलांना हे माहीत असतं की, जवळीकता ही केवळ फिजिकल होणे नाहीये. ती एक भावना आहे, दोन विवस्त्र शरीरांचं शेअरिंग आहे आणि ते तितक्याच मोकळेपणाने मनाने हवं. हे त्याला कळावं हे त्यांना वाटत असतं. 
 
संवादाचं आणि ऐकून घेण्याचं महत्त्व समजावं : सक्षम महिला कधीही अडचणीकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांना संवादाचं महत्त्व माहीत असतं, ऐकून घेण्याचं महत्त्व माहीत असतं. त्यांना हे माहीत असतं की, मोकळेपणाने, शांतपणे केलेल्या संवादाने रिलेशनशिप आणखी मजबूत होऊ शकते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments