शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (17:14 IST)

आशियाई स्पर्धा : महिला कबड्डी संघाचा पराभव

भारतीय महिला कबड्डी संघाला आशियाई स्पर्धेत फायनलमध्ये इराणकडून २७-२४ असा निसटता पराभव स्विाकारावा लागला. या पराभवामुळे गतविजेत्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.  
 
भारतीय महिला संघ सामन्याच्या सुरुवातीला १०-७ असा आघाडीवर होता. पण काही वेळातच इराणने ही आघाडी भरुन काढली. त्यानंतर त्यांनी जिगरबाज खेळ करत भारतावर आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, दुसऱ्या हाफपर्यंत इराणकडे (२२-१९) तीन गुणांची आघाडी राहिली. त्यानंतर सामना संपत आलेला असाताना इराणकडे २५- २१ अशी आघाडी होती. अखेरच्या क्षणी भारत चार गुणांनी पिछाडी कशी भरुन काढणार असे वाटत असतानाच साक्षी कुमारीने चढाई करत तीन गुण मिळवले. पण, इराणने पुन्हा आघाडी वाढवली आणि सामना २७- २४ ने जिंकला.