बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: जकार्ता , सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (16:33 IST)

आशियाई स्पर्धेत नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य

आशियाई स्पर्धेत दुसरा दिवस भारतीयांच्या दृष्टीने कभी ख़ुशी कभी गम या स्वरूपाचा राहिला. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटात सुवर्णभरारी घेतली तर सुशील कुमार या मातब्बर खेळाडूला ७४ किलो वजनी गटात पराभवाचा धोका बसला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी चांगली झाली आहे.
 
भारताचे नेमबाजी क्रीडाप्रकारातील १० मीटर एअर रायफल चे पुरुष खेळाडू दीपक आणि रवी कुमार यांनी अंतिम यादीत स्थान पटकावले. रवी चौथ्या स्थानावर राहिला तर दीपकने तिसरे स्थान पटकावले.
 
शेवटच्या फेरीत दिपकने १०.९ असा लक्ष्य भेद केला, आणि एकूण गुणसंख्या २४७.७ पर्यंत नेली. त्याचबरोबर त्याने रौप्यपदक जिंकले. भारतासाठी एकूण तिसरे तर आजच्या दिवसाचे पहिले पदक जिंकले.