मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 जुलै 2018 (10:56 IST)

सोने किमतीत घसरण

सोने किमतीत घसरण होत असून सोने दागिण्यांच्या मागणीत घट दिसून आली. सलग चौथ्या दिवशी सोने दरात घट दिसून आली. सोने ९५ रुपयांनी घसरुन ३१,११५ रुपये प्रति १० ग्रॅम दर होता. जागतिक बाजारात आलेले मंदी आणि स्थानिक सराफा बाजारात कमी झालेली मागणी यामुळे आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोने दरात घट पाहायला मिळाली. सोन्याचा भाव ९५ रुपयांनी घटून तो ३१,११५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीही मागणी अत्यंत कमी झाली. त्यामुळे चांदीचा किलोचा दर ४०,०३० रुपयांवर स्थिर राहिला.
 
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर मजबुत झाल्याने रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे रुपयातील घसरणीचा कल सोन्याच्या किमतीत दिसून आला. त्यामुळे सोने दरात घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीचा भाव ४०,०३० रुपये प्रतिकिलो राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३५  रुपयांच्या तेजीसह ३९,२६६५रुपये किलो झाला. चांदीच्या नाण्यांच्या नुकसानीत एक हजार रुपयांनी घट झाली आणि तो ७४ हजार रुपये आणि एक हजार रुपयांच्या नुकसानाने प्रति शेकडा ७५ हजार रुपये तोटा झाला.