शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (09:11 IST)

आता एसटी महामंडळाची सुद्धा 'शयनयान बस'

एसटी महामंडळाची विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी आता पूर्ण झाली आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर लवकरच ही विनावातानुकूलित शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. याआधी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० जानेवारी २०१८ रोजी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाहीसोबत विनावातानुकूलित शयनयान एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. 
 
महामंडळाची प्रोटोटाइप म्हणून ही बस बांधलेली आहे. पुणे येथील सीआयआरटीने प्रमाणित केल्यानंतर तब्बल एक हजार बसची बांधणी करण्यात येईल. २ बाय १ अशा प्रकारची ३० आसने या शयनयान एसटीत आहेत. ही एसटी आंतरराज्य मार्गावर रातराणीच्या जागेवर धावेल. रात्री प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून महामंडळाने विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय घेतला होता. रातराणीच्या सध्या ६०० बस राज्यभर धावत आहेत. रातराणीच्या तिकीट दरांमध्ये विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.