टोयोटाने २६२८ वाहने परत मागविली
टोयोटा कंपनीने इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरचे २६२८ वाहने परत मागवल्या आहेत. या वाहनांच्या फ्युल होज राऊटिंगमधील (इंधन संयंत्र) बिघाडाची शंका असल्याने या मॉडेलच्या कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून याचा तपास केला जाईल आणि जर त्यात बिघाड असेल तर तो बदलून दिला जाईल. यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. वॉरंटी अंतर्गतच याची दुरूस्ती केली जाईल. या घोषणेतंर्गत १८ जुलै २०१६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान उत्पादित पेट्रोल इंजिन असलेल्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर परत मागवल्या आहेत.
याप्रकरणी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने म्हटले की, सुरक्षा आणि ग्राहकांच्या समाधानासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. त्यामुळे भारतातील ही वाहने आम्ही परत मागवत आहोत. यापूर्वी मे महिन्यात कंपनीने एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१८ दरम्यान उत्पादित इनोव्हा क्रिस्टा स्वैच्छिक रूपाने मागवले होते.