लग्नापूर्वी जोडीदाराबद्दल जाणून घ्या या गोष्टी
लग्न करण्यापूर्वी आपण ती व्यक्ती, त्याचे कुटुंबीय, पैसा या गोष्टी पाहात असतो. मात्र, आयुष्यभराची सोबत निभावण्यासाठी, नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी आणखीही काही गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या इतके प्रेमात पडतो की काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पाहुया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लग्नापूर्वी तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.
तुमचा जोडीदार लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. तुमचा जोडीदार कुणाच्या दबावाखाली येऊन तर लग्नासाठी तयार झाला नाही याची खात्री करा. होणार्या जोडीदाराच्या नोकरीची व्यवस्थित चौकशी करा. शिवाय त्याच्या पगाराबद्दलही जाणून घ्या. लग्नानंतर तुमचा जोडीदार एकत्र कुटुंबात राहू इच्छितो की स्वतंत्र याबद्दल जाणून घ्या. होणारा जोडीदार कमवत नसेल तर त्याला त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल विचारा. तो कोणावर अवलंबून तर नाही ना याची खात्री करा. त्याच्या आवडी-निवडी जाणून घ्या. त्याची एखादी सवय तुम्हाला बिलकूल न आवडणारी असू शकते. त्यामुळे भविष्यात वाद उद्भवू शकतो. फॅमिली प्लॅनिंगबाबत तुमच्या जोडीदाराचा काय विचार आहे हे जाणून घ्या.