शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स

तर तुम्ही फायनली आपल्या कूल चैट फ़्रेंडशी भेटायला जात आहात किंवा आपल्या बॉयफ्रेंड सोबत पहिल्यांदा डेटवर जात आहात. तुम्ही  एक्‍साइटेड आहात आणि थोडे नर्वस देखील फील करत आहात, डोंट वरी, नर्वसनेस तिकडेही असेल. पण...... जर तुम्ही तुमच्या जीवनात प्रथमच डेटवर जात आहे तर तुमच्यासाठी खास टिप्स आहेत.   
 
बोला : जोडीदाराची इच्छा तुम्हाला बाहेर घेऊन जायची असेल आणि त्याला तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायचा असेल तर त्याचे मन ठेवण्यासाठी त्याचा होकार देऊ नका. जेव्हा तुम्ही कम्‍फर्ट व्हाल तेव्हाच हो म्हणा. डेटवर गेल्यावर तुम्ही घाबरून जाऊन काहीही ऑर्डर देऊ नका बलकी तुमच्या पसंतीचे ऑर्डर द्या.
परिधान : पहिल्यांदा डेटवर जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये नेहमी अशा प्रकारचे ड्रेस परिधान करा ज्यात तुम्ही नीट बसू शकता आणि चालू ही शकता. प्रथम डेटवर बिलकुल आरामदायक कपडे परिधान करा ज्यात तुम्ही पूर्णवेळ कंफर्ट अनुभवाल.  
त्याला जाणीव करून द्या की तोच तुमचा मॅन आहे : जर डेट वर तुम्हाला एखाद्या पुरुषाला इम्‍प्रेस करायचे असेल तर त्याला ही जाणीव करून द्या की तोच तुमचा हीरो अर्थात मॅन आहे. जसे - जर तुम्हाला काही हवे असेल तर वेटरला स्वत:न बोलवता त्याच्याकडून बोलवावे. त्याला तुमचा प्रोटेक्‍टटर बनायचा मोका द्या ज्याने तो तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.
जास्त खाऊ नये : पहिल्याच डेटवर एकदम पोटभर खाण्याची गरज नसते. तो तुम्हाला फोर्स करेल पण तुम्ही सीमित आणि लाइट वस्तूंचे सेवन करा. यामुळे तुमचा क्लास मेंटेन राहील.  
तुमच्या हातांना मऊ ठेवा : डेटवर जेव्हा पार्टनर तुमचा हात त्याच्या हातात घेईल तेव्हा त्याला अशी जाणीव झाली पाहिजे की तुमचे हात फारच मऊ आहेत. त्याला स्वत:चा हात तुमच्या हातासमोर मोठा आणि कठोर अनुभवायला पाहिजे, त्याने तुमचे प्रेम अधिक वाढेल. हातांना मऊ ठेवण्यासाठी मॅनीक्‍योर करा आणि नेहमी मॉश्‍चराइजर लावून ठेवा.
फोन दूर ठेवा : डेटवर जाताना आपल्या फोनला दूर ठेवा. प्रत्येक क्षणी आपल्या फोनकडे लक्ष्य असणे उत्तम दिसत नाही. तसेही जर तुम्ही कुणासोबत बसला असाल तर बोलताना तुमचे लक्ष्य त्या व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे न की मोबाइल वर. 
दुसर्‍या मुलांबद्दल बोलू नये : डेटवर गेल्यानंतर कधीही आपल्या पार्टनरसोबत दुसर्‍या मुलांसोबत झालेल्या डेटबद्दल किंवा त्यांच्यासोबत फिरण्याबाबत बोलू नये. असे केल्याने तुमच्या संबंधांवर याचा विपरित प्रभाव पडू शकतो. त्यापेक्षा तुमच्या स्वत:बद्दल किंवा तुम्ही नुकतेच नवीन काय केले आहे याबद्दल बोलावे.
प्रश्न विचारा : तुमच्या गोष्टी बर्‍याच वेळापर्यंत चालायला पाहिजे म्हणून त्याच्याशी काही प्रश्न विचारा. तुम्ही त्याच्या हॉबी, फॅमिली, मित्र, त्याचे फेवरेट म्युझिक इत्यादींबद्दल विचारा. काही असे प्रश्न जसे, राजकारण, सॅलरी किंवा त्याचा इगो हर्ट होईल असे प्रश्न विचारू नका.
बोला पण प्रत्येक गोष्ट उजागर करू नका : डेट दरम्यान व्यक्तीशी डेट करा, त्याच्याशी बोला पण त्याला प्रत्येक गोष्ट सांगू नका. असे वातावरण निर्मित करा ज्यामुळे तुम्ही जास्त पर्सनल किंवा इमोशनल न झाल्याचे बरे.  
 
तर आता वर दिलेल्या सर्व गोष्टी नीट वाचा आणि डेटवर जाण्याची तयारीला लागा.