निरोगी नात्यासाठी प्रेमाची भाषा वापरा
कोणत्याही नात्याला कधीही सहज घेऊ नका अन्यथा ते आपली ऊर्जा गमावून बसतात. आपण देखील आपल्या नात्यातला उबदारपणा टिकविण्यासाठी ही प्रेमाची भाषा अवलंबवा.
* कॉम्प्लिमेंट द्या आणि आपल्या शब्दांमध्ये आणि भाषेमध्ये बदल करा -
बऱ्याच वेळा असे होते की आपण आपल्या मनातल्या मनातच बऱ्याच गोष्टी दडवून बसतो म्हणजे जे आपल्याला वाटते ते व्यक्त करण्याकडे दुर्लक्षित करतो.पण नात्यात असे करू नका. जर आपल्याला जाणवते की आपला जोडीदार काही वेगळा दिसत आहे किंवा त्याने जे परिधान केले आहे ते त्याच्या वर छान दिसत आहे तर त्याला आवर्जून कॉम्प्लिमेंट द्या. त्याला सांगा की त्याच्या वर हा रंग छान दिसत आहे किंवा केलेली केश रचना सुंदर आहे. अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट्स दिल्याने दोघांचे नाते दृढ होतील.
* आपल्या व्यवहाराने प्रेम आणि काळजी दर्शवा-
आपल्या जोडीदाराच्या आवडीचे बनवून खाऊ घाला किंवा काही सरप्राइज द्या, कारण असे म्हणतात की आपली कृती बरंच काही सांगते. कधी स्वतःहून कपड्यांना इस्त्री करा, तर कधी घर कामांमध्ये मदत करा. हे आपल्यावरच निर्भर आहे की आपण कशा प्रकारे आपले प्रेम व्यक्त करता परंतु हे करणे महत्त्वाचे आहे.
* क्वालिटी टाइम -
आपण दोघेही व्यस्त राहता पण दोघांनी एकत्र घालवलेला वेळ खूपच सुंदर असावा. कधी ऑफिस मधून लवकर येऊन रोमँटिक डिनर ची योजना आखा, कधी मूव्हीला जा, कधी लॉंग ड्राइव्ह जा, हे संभव नसेल तर आठवड्याचे शेवटचे दिवस एकत्र घालवा किंवा सुट्टीची योजना आखा. जेणे करून संपूर्ण वेळ आपण एकमेकांसह एकत्ररीत्या घालवू शकता. या ठिकाणी ऑफिसची चर्चा नको किंवा कोणतेही नातेवाईक नको, दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉप पण नको. फक्त दोघांनीच एकमेकांना समजून घ्यावं.
* भेट वस्तू देणं आवश्यक आहे, जे न बोलता आपले प्रेम दर्शवतात -
महागड्या भेटवस्तू द्यावे असे काही आवश्यक नाही, आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एक गुलाबाचे फुल देखील पुरेसे आहे.कधी बायकोच्या आवडीची आइसक्रीम न्यावी तर कधी नवऱ्याच्या आवडीची कोपऱ्याच्या दुकानातून मिठाई आणावी किंवा त्यांच्या साठी काही बनवून द्यावं. भेट देत राहा आणि आपले प्रेम दर्शवत राहा.कारण प्रेम करणेच नव्हे तर त्याला योग्यरित्या दर्शवणे आणि व्यक्त करणे देखील महत्त्वाचे आहे.
* भावनाच नव्हे तर शारीरिक अभिव्यक्ती दर्शवावी -
मनात किती ही प्रेम आहे पण जो पर्यंत हात हातात घेऊन दर्शवणार नाही तर समजेल कसे? त्यासाठी स्पर्श करावे लागेल. जवळ बसून हात हातात घेणं, हाताला आपल्या ओठांचा स्पर्श होणं,गोड चुंबन घेणं हे सर्व मोठ्या प्रेमाच्या गोष्टीं पेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे. स्पर्श महत्त्वाचे आहे हे स्पर्श करून व्यक्त करावे. जाणीव करून द्या की मला काळजी आहे तुझी. किंवा कधी जोडीदार तणावात असेल तर हळुवार पणे त्याच्या पाठीवरून हात फिरवा जेणे करून त्याला समजेल की आपण एकटे नाही आणि आपला जोडीदार प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत आहे म्हणून काळजी नसावी.