शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (15:21 IST)

Long-distance relationship : या गोष्टींची काळजी घ्या

लॉन्ग डिस्टेंसचे नाते टिकवून राखणे खूप अवघड असतं. या मध्ये नातं तुटायची भीती नेहमीच असते. आपल्याला या नात्याला सुदृढ करण्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. तसेच या नात्याला यशस्वी करण्यासाठी देखील काही छोट्या-छोट्या गोष्टीना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 
 
अश्या प्रकाराच्या नात्यांमध्ये जोडीदाराशी वेळोवेळी भेट करता येत नाही, त्या मुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. पण जर आपण या लॉन्ग डिस्टेंसच्या नात्यात काही गोष्टींची काळजी घेतली तर या नात्याला तुटण्या पासून वाचवू शकतो. 
 
* संवाद साधावा -
आपल्या संबंधांना दृढ करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. वेळोवेळी आपल्या जोडीदाराला कॉल करा. जर आपण कॉल करू शकत नसल्यास मॅसेज किंवा संदेश वर गोष्टी करा. एकमेकांशी संवाद साधल्यास आपले नाते अधिक दृढ होतात. असे ही असू शकत की आपण आपल्या व्यस्ततेमुळे आपल्या जोडीदाराला कॉल किंवा मॅसेज करू शकत नसल्यास, आपल्याला निवांत वेळ मिळाल्यावर कॉल किंवा मॅसेज करा. बहुतेक लांब अंतराच्या संबंधांमध्ये बिघाड होण्याचे कारण संवाद न होणं असतं.
 
* व्हिडिओ कॉल करून बोला -
आपल्या संबंधाला दृढ करण्यासाठी व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. जर आपल्याला वाटत आहे की आपल्या नात्यात किंवा संबंधात कोणत्याही प्रकाराची समस्या उद्भवू नये तर काहीसा वेळ काढून एकमेकांना व्हिडिओ कॉल करून संवाद साधा.
 
* आपले फोटो सामायिक करा -
आपले नाते दृढ करण्यासाठी आपण आपल्या जोडीदाराला आपले फोटो पाठवत राहा. दर रोज दिवसाची सुरुवात आपला एक फोटो पाठवून करू शकता. फोटो बघितल्यावर आपल्या जोडीदाराला आपली आठवण नक्कीच येणार. याच प्रमाणे आपल्या जोडीदाराला देखील त्याचे फोटो पाठवायला सांगा. असे केल्याने आपले नाते अधिकच दृढ होणार.
 
* भेटीसाठी वेळ काढा -
आपण आपल्या जोडीदारापासून लांब जरी असाल तर अधून मधून सुट्टी काढून भेटण्यासाठी वेळ काढा आणि दोघे एखाद्या सहलीला जाण्याचा बेत आखा. असे केल्याने आपल्या मधील प्रेम वाढेल. कोणत्याही नात्याला बळकट करण्यासाठी एकमेकांबरोबर वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे.
 
 
* प्रेम व्यक्त करा - 
आपल्या नात्यालाला अधिक मजबूत करा, वेळोवेळी आपल्या प्रेमाला व्यक्त करा. आपल्या नात्यात कोणत्याही प्रकाराची अडचण न येवो आपली अशी इच्छा असल्यास आपले प्रेम आपल्या जोडीदारावर व्यक्त करत राहा.