शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (10:23 IST)

पती-पत्नी यांच्यातील प्रेम वाढेल, केवळ हे करुन बघा

नवरा बायकोचे नाते एक असे नाते आहे, ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभर एकमेकांशी नातं जोडतात. नवरा बायकोचं नातं प्रेमाशी जोडलेलं असत. या नात्यामध्ये प्रेम आणि भांडण दोन्ही असतं. ज्यामुळे हे नातं अधिक दृढ होतं. हे नाते जेवढे मजबूत असतात तेवढेच नाजूक देखील असतात. थोडंसं गैरसमज देखील नवरा-बायको मध्ये तफावत निर्माण करतात. 
 
वास्तूमध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना लक्षात ठेवून आपण आपापसातील प्रेमाला वाढवू शकता.

* विवाहित जोडप्यानी आपल्या शयन कक्षाला घेऊन अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. बऱ्याच लोकांच्या शयनकक्षात टीव्ही, कॉम्पुटर सारख्या वस्तू ठेवलेल्या असतात. वास्तुनुसार या वस्तूंना आपल्या शयनकक्षात न ठेवंच योग्य आहे, कारण या वस्तू शयनकक्षात असल्यावर पती-पत्नीं मधील संवादात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतं.
 
* वास्तू म्हणतं की शयनकक्षाच्या छतामध्ये बीम नसावे जे त्याला दोन भागात विभक्त करतो. अशा प्रकारे बऱ्याच घरांमध्ये डबलबेड असतं, ज्यावर दोन गाद्या असतात. विवाहित लोकांनी आपल्या पलंगावर दोनाच्या ऐवजी एकच मोठी गादी ठेवावी. या मुळे पती-पत्नी मधील प्रेम वाढतं.
 
* शयनकक्षात कधीही अशी चित्रे ठेवू नयेत ज्यामध्ये राग किंवा हिंसा दर्शविली असते. नदी, तलाव, उंच लाटा इत्यादींची चित्रे आपल्या शयन कक्षात लावू नये. शयन कक्षाच्या वर कधीही पाण्याची टाकी किंवा पाण्याची जागा बनवू नका. या मुळे पती-पत्नीमधील नात्यात मतभेद संभवतात. आपसातील प्रेम वाढविण्यासाठी आपल्या खोलीत सुंदर पक्ष्यांची चित्रे लावावी.
 
* विवाहित लोकांनी आपल्या खोलीतील दक्षिण-पश्चिम भागाला सजवून ठेवावं खोलीत अशा रंग द्यावा ज्याला बघितल्यावर मनाला आनंद वाटेल. शयनकक्षात फिकट गुलाबी किंवा फिकट आकाशी रंग द्यावा. हे रंग पती-पत्नी मधील प्रेमाला वाढवतं.