गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

स्त्रियांमध्ये या 4 प्रकाराचे ऑर्गेज्म आनंद देतात

वैवाहिक जीवनात सेक्स हे टॉनिकसारखे काम करते, परंतु आजही अनेक स्त्रिया सेक्सला आपल्या जोडीदाराप्रती फक्त एक बंधन मानतात आणि ते त्यांच्या आनंदासाठी करतात, तर सेक्स किंवा संभोग म्हणजे दोघांचाही समान आनंद घेण्याची प्रक्रिया. त्यामुळे आता सेक्स म्हणजे केवळ पाटर्नर म्हणून कर्तव्य असल्याचे समजू नका, तर त्यात आनंद घेऊन आपले वैवाहिक जीवन अधिक आनंदी करा. तुम्हाला कदाचित माहित नसेल की स्त्रियांना चार प्रकारचे कामोत्तेजक असतात.
 
क्लिटोरल ऑर्गेज्म
हे महिलांसाठी सर्वोत्तम ऑर्गेज्म मानले जाते. महिलांचे क्लिटॉरिस हे अतिशय संवेदनशील असते, कारण शरीरातील अनेक स्नायू त्याच्याशी जोडलेले असतात. यामध्ये अगदी क्षुल्लक उत्तेजना देखील स्त्रियांना अपार आनंद देते. थोडा वेळ बोटांनी किंवा जिभेने स्पर्श केल्याने महिलांना क्लिटोरल ऑर्गझमचा अनुभव येतो.
 
जी-स्पॉट ऑर्गेज्म
अनेक लोकांसाठी जी स्पॉट अस्तित्वात आहे की नाही हा आजगयत वादाचा मुद्दा आहे. याच्या समर्थकांच्या मते ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे ते त्याचे अस्तित्व कधीच नाकारू शकत नाहीत. असे मानले जाते की क्लिटॉरिसच्या खालच्या भागात एक जी-स्पॉट आहे, जेव्हा ते उत्तेजित होते तेव्हा महिलांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो. हे भावनोत्कटता क्लिटोरल ऑर्गेझमपेक्षा अधिक समाधानकारक आणि आनंददायी असते.
 
ब्लेंडेड ऑर्गेज्म
नावाने स्पष्य होतंय की हे दोन ऑर्गेज्म याचे मिश्रण आहे अर्थात यात क्लिटोरियल ऑर्गेज्म आणि जी-स्पॉट ऑर्गेज्म दोन्हींचा अनुभव सोबत होतो. यासाठी तुम्हाला योनीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागांना एकाच वेळी उत्तेजित करावे लागेल. हे तितकं सोपं नसलं तरी यातून मिळणारा दुहेरी फायदा तुम्हाला एकदा करून बघायला नक्कीच प्रोत्साहन देईल.
 
मल्टीपल ऑर्गेज्म
होय निसर्गाने स्त्रियांना मल्टीपल ऑर्गेज्मचा आनंद दिला आहे, जो पुरुषांना नाही. तथापि फार कमी महिलांना याचा अनुभव घेता येतो, कारण ते तुमच्या जोडीदाराच्या क्षमतेवर अवलंबून असते. पहिल्या संभोगानंतर, जर तुम्ही दोघांनी पुन्हा क्लायमॅक्स गाठण्याचा प्रयत्न केला तर याची शक्यता वाढते. पुरुषांनी आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी हा प्रयत्न नक्कीच करावा. तुमच्या जोडीदाराला अतिरिक्त आनंद देण्यासाठी तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी हे करू शकता.