गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (15:39 IST)

शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी काय खाऊ नये? काय खावे हे देखील जाणून घ्या

love
अलीकडेच वैज्ञानिक निष्कर्षाप्रमाणे योग्य आहाराचा आनंद घेतल्याने शारीरिक संबंध ठेवणे रुचिकर होतं असे सांगण्यात आले आहे. रक्त प्रवाह आणि ऊर्जेच्या पातळीत वृद्धीने, उत्साह, आणि संबंधाचा मजा वाढतो. तुम्ही अशा खाद्यपदार्थांबद्दल ऐकले असेल जे तुमची पॉवर वाढवतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही खाद्यपदार्थ आहेत, जे खाऊन तुम्ही त्या खास क्षणांची मजा लुटू शकता. आम्ही अशा काही गोष्टींची यादी तयार केली आहे ज्या संबंध ठेवण्यापूर्वी न खाणे चांगले.
 
माणसाच्या मुलभूत गरजांप्रमाणेच भाकर आणि पाणी या आहेत. त्याचप्रमाणे एक आणखी मोठी गरज आहे ती म्हणजे शारीरिक भूक. मात्र ही एक वासना नसून एक अतिशय पवित्र नाते आहे जे दोन आत्म्यांच्या मिलनातून नवीन निर्मितीला जन्म देते. म्हणजेच एका सृष्टीतून नवनिर्मितीचा जन्म पिढ्यानपिढ्या चालू असतो.
 
आता जेव्हा आपण या नात्याला पवित्र मानतो तेव्हा काही खास अन्न असावे जे ही प्रक्रिया अधिक सक्रिय करते. आता कदाचित तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की अन्नाचा याशी काय संबंध? तर होय घनिष्ठ संबंध आहे. तुमच्या असे कधी लक्षात आले आहे का की एखादे विशिष्ट अन्न खाल्ल्यानंतर तुमची संबंध स्थापित करण्याची इच्छा वाढते किंवा तुम्हाला किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक सुस्ती वाटते आणि तुम्हाला काहीही करावेसे वाटत नाही. 
 
वास्तविक या दोन्ही परिस्थिती थेट आपल्या अन्नाशी संबंधित आहेत.
 
काय खाऊ नये -
रात्री मैद्याने तयार केलेले पदार्थ खाणे टाळा. मैदा पोटात जाऊन फुलतो आणि लवकर पचत नाही. अशात संबंध बनवण्यात पोटासंबंधी तक्रार येऊ शकते.
फास्टफूड- पिझ्झा- बर्गर या सारखे फास्ट फूड खाल्ल्याने शरीराच्या हॉर्मोन्सवर प्रभाव पडतो. याने लठ्ठपणाही वाढतो. रात्री हे पादर्थ खाल्ल्याने आळस वाढतो.
शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक किंवा दारूचे सेवन करणे विषाप्रमाणे आहे. दारुचे सेवन केल्यानंतर शरीरात तयार होणारे हॉर्मोन्स या प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकतात.
 
काय खावे-
रात्री हलका आहार घ्यावा. दही-भात यासारखे पदार्थ दुपारी घ्यावे, रात्री याचे सेवन टाळावे.
जेवण झाल्यानंतर गुळाचे सेवन करावे. गुळ खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यात मदत होते आणि ताकदही वाढते.
शक्य असल्यास रात्री गायीच्या दुधाचे सेवन करावे. गायीच्या दुधात शुद्ध तूप मिसळून प्यायल्याने ताकद वाढते.
पांढरा कांद्याचा मोरब्बा सतत खात राहिल्याने पॉवर जवळपास 100 पटाने वाढते. राजे, महाराजे अनेक लोक हा मोरब्बा खात असत.
अधिक लक्ष देणे शक्य नसल्यास आपण संबंध बनवण्यापूर्वी अश्वगंधासोबत दूध जरूर प्यावे. अश्वगंधा नियमित वापरणे चांगले परंतु वजन अधिक असल्यास खूप जास्त असेल तर वापरू नये.
क्षमता वाढवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे गायीच्या दुधात खडीसाखर मिसळून पिणे.
उडीद डाळ तुपात भाजून त्यात दूध मिसळून खीर बनवून रात्री प्यावी.
संबंध बनवण्याच्या काही तासांपूर्वी शिलाजीत, मधासोबत घेतल्याने ताकद वाढते आणि खूप काळ मजा घेता येतो.
 
शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी तुम्ही यापैकी कोणतीही एक गोष्ट वापरण्यास सुरुवात करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की स्वतःवर संशय घेऊ नका. या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत बनवतात आणि मग तुम्ही एक चांगला प्रियकर असल्याचे सिद्ध करता.
 
संबंध ठेवण्यापूर्वी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्यास स्ट्रॉबेरी आणि रसभरी खाऊ शकता.
 
ताकत वाढवण्यासाठी काय खावे?
विशेषत: पालक, ब्रोकोली आणि कोबी प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात. संशोधकांच्या मते, पालक मॅग्नेशियमचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, जो रक्तवाहिन्या पसरवतो. सुधारित रक्त प्रवाह, पुरुष आणि स्त्रियांमध्ये उत्तेजना निर्माण करते. अंजीर हे असे अन्न मानले जाते जे ड्राइव्ह वाढवते.