सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

प्रेयसीला मनविण्याच्या काही खास पध्दती अवलंबवा

प्रत्येक नात्याचे आपापले महत्व आहे. नातं कुठलं ही असो त्यामध्ये रुसवे फुगवे होतातच. पण प्रियकर आणि प्रेयसी चे नाते असे आहे ज्या मध्ये गैरसमज झाल्यामुळे दुरावा येतो. प्रेयसी रागावून जाते की तिला समजविण्यासाठी खुशामदी कराव्या लागतात. तरी ही प्रेयसीचा राग काही निवळतच नाही. आज आम्ही सांगत आहोत असे काही टिप्स ज्यामुळे आपली प्रेयसी रागावली असेल तर सहज तिचा राग निवळेल. चला तर मग जाणून घेऊ या.   
 
* आपली बाजू मांडा- 
सर्वप्रथम प्रेयसी कोणत्या गोष्टीवरून रागावली आहे ते जाणून घ्या आणि नंतर तिला समजवा. आपण केलेली एखादी गोष्ट जर तिला आवडली नसेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करा आणि क्षमा मागायला कमी पणा येऊ देऊ नका. तिचा राग निवळेल.  
 
* माफी मागा-
केलेल्या चुकीसाठी तिची माफी मागून तिचा हात धरा किंवा मिठी द्या असं केल्यानं आपण पूर्ण प्रामाणिकपणे  केल्यावर तिचा राग नक्की निवळेल.
 
* खरेदी ला न्यावं -
आपण प्रेयसीला खरेदीला नेऊ शकता आपण तिला विचारा की तिला काय खरेदी करायचे आहे. तिच्या आवडीची खरेदी तिला करू द्या. असं केल्यानं तिचा राग नक्की निवळेल.  
 
* कँडल लाईट डिनर ला न्या-
प्रेयसी रुसली आहे आपल्याशी काहीच बोलत नाही तर आपण आपल्या एखाद्या कॉमन मित्राच्या मार्फत तिच्याशी संवाद साधा. तिला कँडल लाईट डिनर साठी बाहेर न्यावे किंवा घरातच कँडल लाईट डिनर करू शकता. असं केल्यानं आपल्या रुसलेल्या प्रेयसीचा राग नाहीसा होईल.