Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा हत्ती आणि गाढव जंगलातील हिरव्यागार शेतात फिरत होते. गवत चरत असताना गाढव म्हणाला, “हत्ती दादा! या निळ्या गवताची चव काही वेगळीच आहे.” “तू काय म्हणालास? निळे गवत?”, हत्तीआश्चर्याने विचारले. “हो, या निळ्या गवताची चव खूप चांगली आहे.”, गाढव आत्मविश्वासाने म्हणाला. “तू किती मूर्ख आहे, हे गवत हिरवे आहे, निळे नाही”, हत्तीने त्याची थट्टा करत म्हटले. ALSO READ: नैतिक कथा : उपकारांची जाणीव ठेवा यावर गाढव रागाने म्हणाला, “अरे दादा! तुझा मेंदूही तुझ्यासारखाच जाड झाला आहे, तुला हा निळा रंग दिसत नाही.” गवताच्या रंगावरून दोघांमध्ये वाद वाढला, दोघेही एकमेकांना मारण्यास तयार झाले. शेवटी असे ठरले की त्यांनी जंगलाचा राजा सिहंकडे जावे आणि तोच ठरवेल की कोण बरोबर आहे आणि कोण चूक. गाढव आणि हत्ती आणि सिंहाजवळ पोहोचले. सिंहाला पाहून गाढवाने मोठ्याने म्हटले, “महाराज, कृपया या मूर्खाला सांगा की गवताचा रंग हिरवा नाही तर निळा आहे.” सिंह म्हणाला, “हो, तुम्ही अगदी बरोबर आहात. गवताचा रंग निळा आहे.” गाढवाने हसून हत्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, “या मूर्खाला शिक्षा करा, जेणेकरून तो भविष्यात अशी चूक करू नये.” सिंह म्हणाला, “आम्ही हत्तीला एक महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा देतो.” हत्ती अवाक झाला. गाढव गेल्यानंतर तो म्हणाला, “महाराज, कृपया मला माफ करा, पण मी गवताचा रंग हिरवा असल्याचे सांगून कोणतीही चूक केली नाही. मग ही शिक्षा?” ALSO READ: नैतिक कथा : नम्रतेचे महत्त्व सिंह म्हणाला- तुम्हाला गवताच्या रंगामुळे शिक्षा होत नाहीये. तुम्हाला शिक्षा होत आहे कारण एवढा बुद्धिमान प्राणी असूनही, तुम्ही गाढवासारख्या मूर्ख प्राण्याशी वाद का घातलात आणि शिवाय, तुम्ही माझ्याकडे ही समस्या सोडवण्यासाठी आलात आणि माझा वेळही वाया घालवला. म्हणूनच तुम्हाला शिक्षा होत आहे. तात्पर्य : आपण कधीही निरुपयोगी वादात पडून आपला वेळ वाया घालवू नये. ALSO READ: नैतिक कथा : उपकारांची जाणीव ठेवा Edited By- Dhanashri Naik