रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (22:27 IST)

घरात राहून काम करत आहात,तर या गोष्टी करणे टाळा नात्यात दुरावा येऊ शकतो

आजकाल बहुतेक लोक घरूनच काम करत आहेत.कोरोनामुळे सध्या कारण नसताना घराच्या बाहेर पडणे सुरक्षित नाही.कोरोना मुळे घरात 24 तास राहावे लागत आहे.आणि यामुळे घरात पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत.या वादाला काहीही कारण असू शकतं.जर आपण देखील सध्या घरात आहात तर या काही गोष्टी कटाक्षाने करणे टाळावे.या मुळे घरात दोघात भांडण होऊन ते विकोपाला जाऊ शकतात आणि नात्यात दुरावा येऊ शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.कोणत्या गोष्टी करायचा नाही.
 
1 चिडचिड करू नका-आपण घरातून काम करून चिडचिड करत आहात तर आपले असे वागणे कोणी काही दिवस सहन करेल नंतर या मुळे वाद होऊ शकतात.ज्या प्रमाणे आपण घरात राहून कंटाळला आहात त्याच प्रमाणे आपली पत्नी देखील कंटाळली असेल.त्यांची देखील चिडचिड होत असेल .परंतु त्या दर्शवत नाही.त्या घरातील प्रत्येक सदस्यांची योग्य काळजी घेतात सगळ्यांचे लक्ष ठेवतात हे विसरता कामा न ये.
 
2 मनाप्रमाणे वागणे- लक्षात ठेवा की घरावर जेवढे अधिकार आपले आहे तेवढेच आपल्या पत्नीचे देखील आहे.या मुळे आपण घरात आहात म्हणून आपल्या मनाप्रमाणे वागाल आणि इतरांना देखील तशी वागणूक द्याल हे चांगले नाही.म्हणून इतरांच्या इच्छेचा आणि त्यांच्या दैनंदिनीचा देखील मान ठेवा. घरातील इतर सदस्यांना घेऊन चाला.
 
3 आदेश देणे-आपण काम करताना एका जागी बसता आणि प्रत्येक गोष्टीसाठी पत्नीला आदेश देता तर मग अशा परिस्थितीत पत्नीला राग येणं साहजिक आहे. कारण त्यांना देखील त्यांची कामे आहेत.स्वतःचे लहान मोठे काम स्वतःने करावे.जर आपण त्यांना आदेश देत आहात तर हे चुकीचे आहे. या मुळे आपल्यात भांडण होऊ शकतं.
 
4 प्रत्येक कामात हस्तक्षेप करणं-आपण दिवसभर ऑफिसात असाल आणि आपली पत्नी घरात असल्यावर तिला तिच्या घरकामात कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करून ज्ञान पाजवू नका असं केल्याने त्यांना राग येईल आणि दोघात भांडणे होतील.