शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (10:57 IST)

मुलांच्या डोळ्यांवर घरगुती काजल लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

भारतात जन्माला आलेल्या मुलाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काजल लावण्यात येतं. असेही म्हटले जाते की यामुळे मुलाचे डोळे आणि पापण्या मोठ्या होतात. तथापि, बालरोगतज्ञ याची अजिबात शिफारस करत नाहीत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असे करणे खूप हानिकारक आहे. असे असूनही, काजल मुलांच्या कोमल डोळ्यांना लावण्यात येतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे मुलांच्या आरोग्यासाठी विषासारखे काम करतं. मुलांमध्ये हाइअर गट ऑप्जर्पशन असून त्यांच नर्व्हस सिस्टम विकासाच्या प्रक्रियेत असतं. अशात काजलमध्ये आढळणारे लेड विषासारखे कार्य करू शकतं. मुलांना काजल का लावू नये हे जाणून घ्या.
 
काजल का वापरु नये
काजल तयार करण्यासाठी लेड वापरण्यात येतं. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे मूत्रपिंड, मेंदू, अस्थिमज्जा आणि शरीराच्या इतर अवयवांवर देखील वाईट परिणाम करतं. जर रक्तात लेडची पातळी वाढत गेली तर कोमामध्ये जाण्याची शक्यता वाढते आणि गोष्टी इतक्या वाईट होऊ शकतात की एखाद्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत, नवजात मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
 
घरी तयार केलेलं काजल सुरक्षित आहे का?
होममेड काजल नैसर्गिक असल्याचे म्हटले जातं, परंतु होममेड काजल देखील सुरक्षित नसतं. या काजलमध्ये कार्बन असतं जे बाळाच्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतं. मुलांच्या डोळ्यात संसर्ग होण्याचा धोका देखील असतो, कारण हे काजळ बोटाने लावलं जातं.
 
काजळ लावल्याने वाईट नजरेपासून बचाव होता याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. तसंच काजल लावाल्याने मुलं चांगले झोपतात तर डॉक्टर्सप्रमाणे मुलं तसेही दररोज 17 हून अधिक तासा झोप काढतात. तसंच काजल लावल्याने डोळे आणि पापण्या मोठ्या होतात ही गोष्ट तर्कहीन असल्याचं म्हटलं गेलं आहे.