गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

चुकीच्या व्यक्तीशी प्रेम होण्यामागील कारण जाणून घ्या राशीनुसार

अनेकदा प्रेमात पडताना आपल्याला जाणवत असतं की ती व्यक्ती आपल्या अपेक्षेत बसत नाहीये तरी आपण गुंडाळत जातो आणि प्रेमात पडतो. खर्‍या प्रेमाच्या शोधात कित्येक लोकं धोका खातात. समजूत असली तरी मन वळतं काय कारण आहे यामागे जाणून घ्या आपल्या राशीनुसार:
 
मेष: मेष राशीच्या जातकांना माहीत असतं की व्यक्ती आपल्या हिशोबात बसत नाहीये. संबंधात गंभीर नाही तरी ते प्रेमात पडतात. त्यांना वाटतं की आपलं महत्त्व दाखवण्यासाठी देखावा करण्याचं नाटकं आहे परंतू तो देखावा नसून ती व्यक्ती खरंच तशीच असते.
 
वृषभ: प्रेम संबंधात वृषभ राशीचे जातक अधिक संवेदनशील असतात. त्यांना वाटतं आपण करत असलेलं प्रेम त्यांच्या नात्यासाठी पुरेसे आहे. साथीदाराचं त्यांच्यावर प्रेम आहे वा नाही याची काळजी करत नसतात.
 
मिथुन: या राशीचे जातक स्वत:ला जवाबदार ठरवतात मग त्यांची चूक असो वा नसो. चुकीच्या व्यक्तीशी प्रेम झाल्यावर आपल्या भाग्यात असेच असेल असा विचार करतात.
 
कर्क: आत्मविश्वासामुळे चुकीच्या लोकांशी नातं जुळवून घेतात. समोरचा व्यक्ती केवळ आपला वापर करत आहे हे जाणून सुद्धा ते नात्यात असतात. त्यांना स्वत:वर विश्वास असतो की आपल्या प्रेमामुळे व्यक्ती सुधारेल. पण अनेकदा त्यांची ही धारणा चुकीची ठरते.
 
सिंह: या राशीच्या लोकांना ज्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण होतं त्यांना यांची मुळीच किंमत नसते. यांच्यापासून पळ काढणार्‍या लोकांप्रती हे अजूनच आकर्षित होत असतात.
 
कन्या: कन्या राशीच्या जातकांसाठी संबंधात असणे गरजेचे आहे. हे लोकं एकटे जीवन व्यतीत करू शकत नाही. जोपर्यंत नात्यात गंभीर स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत नातं टिकून असतं आणि आपण स्वत:हून त्यात कमी शोधण्याचा प्रयत्नही करत नाही.
 
तूळ: तूळ राशीचे जातक प्रत्येकात काही न काही विशेषता शोधून घेता, म्हणून त्यांना आपल्याला साथीदारात कमी जाणवत नाही. चुकीच्या संबंधात फसण्याचे कारण म्हणजे दुनियेसाठी अगदी वाईट असलेल्या लोकांना हे सहज स्वीकार करतात.
 
वृश्चिक: यांना आव्हान स्वीकारणे आवडतं. समोरचा व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य नाही तरीही त्याला सरळ मार्गावर आणण्याच्या नादात नातं टिकवून ठेवता. हे चॅलेंज स्वीकार करून आपण नातं जुळवून घेता.
 
धनू: या राशीच्या जातकांना परेशान करून सोडणारे व्यक्तीच यांची आवड असल्याने काहीही पर्याय नाही. यांना असे व्यक्ती पसंत येतात ज्यांच्यात छळ काढण्याची कला असते.
 
मकर: या राशीचे खूप लवकर-लवकर प्रेमात पडतात. विना विचार करता प्रस्ताव स्वीकारही करून घेतात. समोरच्या व्यक्तीत एक विशेषता आणि शंभर कमतरता असल्या तरी ती एक विशेषता त्यावर भारी पडते.
 
कुंभ: कुणासोबतही जुळल्यावर ती व्यक्ती कुंभ राशीच्या जातकांची प्राथमिकता असते. साथीदारासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते. समोरच्या मात्र याची जाणीव व काळजी नसल्यामुळे हे विष जीवनात कालवत जातं.
 
मीन: मीन राशीचे जातक अपेक्षाकृत अधिक आशावादी असतात. आपलं साथीदार योग्य नाही तरी त्याची वागणूक बदलेल या आशेवर सहन करत राहतात.