सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : गुरूवार, 17 मार्च 2022 (14:52 IST)

पार्टनरशी प्रामाणिक असणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

असे अनेक वेळा सांगण्यात येतं आणि असेही दिसून आले आहे की, काही वर्षांनी पती -पत्नी दोघांचे चेहरे एकमेकांसारखे दिसू लागतात. जेव्हा भिन्न कुटुंब, पार्श्वभूमी आणि प्रदेशातील दोन लोक एकत्र राहू लागतात, तेव्हा ते कसे एकसारखे दिसतात? आश्चर्य वाटतंय ना? परंतु तज्ञ या मुद्द्यावर पूर्णपणे सहमत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की केवळ देखावाच नाही तर एका जोडीदाराचे आरोग्य देखील दुसऱ्या जोडीदाराच्या आरोग्यावर परिणाम करते. आणि जेव्हा तुम्ही सतत पार्टनर बदलता तेव्हा ते केवळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.
 
मल्टीपल पार्टनर्स असणे हा एक विचारपूर्वक जीवनशैलीचा निर्णय आहे जो काही लोक करतात. तथापि, एकाधिक पार्टनर असणे हे यौन, मानसिक आरोग्य आणि कमी आयुष्याशी नि‍गडित आहे. यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.
 
एखाद्या व्यक्तीच्या सेक्‍सुअल पार्टनर्सचा थेट संबंध जेनाइटल हर्पीज, क्लामीडिया, जेनाइटल वार्ट्स, एचआईवी/ एड्स सारख्या सेक्‍सुअली ट्रांसमिटेड डिजीज (एस.टी.डी.) शी संबंधित असतो. हे संबंध जीवघेण्या आजारांच्या वाढत्या जोखमीशी देखील संबंधित आहे, जसे प्रोस्टेट कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग.
 
हल्ली बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की प्रोटेक्‍शन वापरुन एसटीडी इत्यादींचा धोका दूर केला जाऊ शकतो, परंतु प्रोटेक्‍शनचा वापर करताना आणि सुरक्षित सेक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतानाही ते 100% सुरक्षित नाही. दुर्दैवाने, लोकांना एचआयव्ही किंवा आजीवन आजार हिपॅटायटीस 'बी' विषाणूची लागण होऊ शकते.
 
या मिथकांवर विश्वास ठेवू नका की जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुम्हाला एसटीडी मिळणार नाही किंवा ओरल किंवा एनल संबंधातून मिळणार नाही. तुमच्या तोंडात, गुदद्वारात किंवा तुमच्या गुप्तांगाच्या बाह्य भागामध्ये लहान जखम/कट झाले तरीही एसटीडीला कारणीभूत असणारे अनेक विषाणू आणि बॅक्टेरिया तुमच्या रक्तात येऊ शकतात.
 
मल्‍टीपल पार्टनर्स असलेले लोक कधीकधी परफॉर्मेंस एंग्जायटी सामोरे जातात आणि त्यांना दीर्घकाळ नातेसंबंध राखणे किंवा टिकवणे कठीण होऊ शकते. याद्वारे वर्तमान नातेसंबंधामुळे होणार्‍या नुकसानाबद्दल साबोलण्याची गरज नाही.
 
भविष्यात, यामुळे स्वतःबद्दल गैरसमज, अप्रभावी संबंध आणि नैराश्य यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत जी दर्शवतात की निरोगी संबंध दीर्घकाळ चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवतात.
 
लक्षात ठेवा की दीर्घकालीन संबंधांमुळे सर्वोत्तम भावनिक, शारीरिक आणि यौन आरोग्य मिळू शकतं. जर तुम्ही पार्टनर बदलत राहिलात, तर तुम्हाला याची किंमत तुमच्या आरोग्य आणि वयाद्वारे मोजावी लागू शकते.