बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

लव्ह टिप्स : प्रेम कसे व्यक्त करावे

जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करता तर तिच्यावर आपले प्रेम कसे व्यक्त कराल या साठी काही टिप्स सांगत आहोत. हे आपल्या कामी येतील. 
 
1 बोला- जर आपल्याला एखादी मुलगी आवडते तर सर्वप्रथम तिच्याशी बोलणे सुरू करा. असं कराल तेव्हाच आपण आपले मनातले सांगू शकाल. आपण आपले मनातले सांगायला आपल्या मित्राची मदत घेऊ शकता.
 
2 मैत्री करा- जेव्हा आपण तिच्या शी बोलणे सुरू कराल नंतर तिच्याशी मैत्री करा. जेणे करून आपले नाते हळू-हळू वाढेल.
 
3 मदत करा- जिच्यावर आपण प्रेम करता. ती अडचणीत आल्यावर तिला मदत करा. जेणे करून तिच्या मनात आपल्यासाठी चांगल्या भावना येतील.
 
4 भावनांना समजून घ्या- नेहमी तिच्या भावनांना समजून घ्या. ती जे सांगते ते ऐकून घ्या. कधीही तिच्या भावनांना दुखवू नका किंवा तिच्या भावनांशी खेळू नका. 
 
5 फिरायला जा- आपल्या मधील मैत्री चांगली झाली असेल तर तिच्या समवेत जास्त वेळ घालविण्यासाठी फिरायला जा.
 
6 विश करा- सध्याचा काळ इंटरनेट चा आहे तिच्याशी संपर्कात राहण्यासाठी तिला गुडनाईट /गुडमॉर्निग विश करा.लव्ह चे मेसेज पाठवू नका. हे तेव्हाच पाठवा जेव्हा ती आपली गर्लफ्रेंड बनेल. 
 
7 घाई करू नका- मुलीला प्रपोज करण्याची घाई करू नका. जेव्हा आपल्याला वाटेल की ती पण आपल्याला पसंत करते किंवा आपल्याला जोडीदार म्हणून बघते तेव्हाच प्रपोज करा. अन्यथा मैत्री तुटू शकते.
 
8 प्रपोज करा- मुलीला प्रपोज करण्यासाठी तिला बागेत, मूव्हीला घेऊन जा आणि प्रपोज करा.प्रपोज करताना फुलांचा गुच्छ , चॉकलेट न्या.
 
9 प्रेम व्यक्त करा- मुलीला आपल्या मनातले सांगून प्रेम व्यक्त करा. जर तिच्या मनात देखील त्याच भावना आहे तर ती होकार देईल .अन्यथा नकार देईल. कधी कधी काही मुली होकार देण्यासाठी वेळ घेतात. आपण तिला पुरेसा वेळ द्या. 
 
10 नकार मान्य करा  - जर ती मुलगी आपल्या प्रेमाचा नकार करते तर त्याला मान्य करा. या वर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. असू शकते की काही दिवसाने ती स्वतः आपल्याला असे म्हणेल की माझे तुझ्यावर प्रेम आहे.