1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (20:42 IST)

Relationship Tips : सुरुवातीच्या काळातच नात्यात ब्रेकअप होण्यासाठी या सवयी जबाबदार असतात

प्रेमाची सुरुवात नेहमी दोन लोकांमधील परस्पर समज आणि विश्वासावर अवलंबून असते. पण काही लोकांचे नाते सुरुवातीच्या काळातच तुटल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. असे लोक नेहमी दुखी असतात. त्यामुळे असे का होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण नाते तुटणे ही जोडीदाराची चूक मानत असाल तर नक्कीच एकदा स्वतःचा विचार करा. कारण कधी-कधी अनेक सवयी नात्यात ब्रेकअप होण्यासाठी कारणीभूत असतात.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मेसेज करा- जोडीदाराची काळजी घेताना वेळोवेळी फोन कॉल किंवा मेसेज करणे खूप गरजेचे आहे. कारण अनेक वेळा कामाच्या व्यस्ततेमुळे हे करता येत नाही. त्यामुळे जोडीदारावर चुकीचा प्रभाव पडतो आणि त्यांना असे वाटते की आपल्याला त्यांची   काळजी वाटत नाही. अशा स्थितीत जोडीदाराशी वेळोवेळी मेसेजद्वारे बोलणे गरजेचे आहे.
 
2 वेळ द्या- आपण नुकतेच नातेसंबंध जोडले असल्यास, आपल्या जोडीदारास भेटण्यासाठी वेळ द्या. मित्र किंवा कुटुंबासह बाहेर जाण्याव्यतिरिक्त जोडीदारासाठी वेळ काढणे केव्हाही चांगले. असे न केल्याने अनेकदा गैसमज होऊन ब्रेकअप होते. 
 
3 मोकळेपणा द्या- पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात जास्त फोन कॉल्स किंवा मेसेज करून ढवळाढवळ करत असाल तर हे देखील ब्रेकअपचे कारण बनू शकते.त्यांना मोकळीक देणे आवश्यक आहे. 
 
4  फोनचा अति वापर करणे टाळा - जर काही लोकांची सवय असते की जोडीदारा पेक्षा फोन जास्त आवडत असेल तर काळजी घ्या. अशा लोकांचे ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त असते. कारण जेव्हाही आपण जोडीदारासोबत बसण्यासाठी वेळ काढता आणि बोलण्या ऐवजी फोनवर असता किंवा सतत कॉलवर असता, तेव्हा नात्यावर नकारात्मक परिणाम होऊन ब्रेकअप होऊ शकतो.