बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (08:30 IST)

लॉक डाऊन मध्ये पती पत्नीमध्ये भांडण होऊ नये या साठी टिप्स

देशात सध्या कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे लॉक डाऊन सुरु आहे.लोकांना गेल्यावर्षी प्रमाणे घरीच राहून काम करावे लागत आहे.त्यामुळे पती-पत्नीमध्ये देखील शुल्लक कारणावरून वाद होत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मध्ये दुरावा येत आहे. असं होऊ नये  यासाठी काही टिप्स सांगत आहोत .चला जाणून घेऊ या.
 
* एकत्र राहावे- लॉक डाऊन मुळे नवरा बायको घरात आहे.तरी काही जोडपे अशे असतात जे एकत्र वेळ घालवत नाही त्यामुळे त्यांच्यात भांडणे होतात. जोडप्यानी असं करू नये. दोघांनी एकत्र वेळ घालवावा.
 
 * एकमेकांना मोकळीक द्या- जोडप्यांमध्ये भांडणे होण्याचे मुख्य कारण एकमेकांना मोकळीक न देणे.त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगू द्या. पती -पत्नींना एक मेकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नये. एक मेकांना मोकळी द्या.
 
* एकमेकांना मदत करा- असं बघण्यात येत की घर कामात बायकांनाच राबावे लागते त्यामुळे त्यांची चिडचिड होते.आणि त्यामुळे घरात भांडणे होतात.घर कामात दोघांनी मिळून केले तर काम लवकर होईल आणि आपले नाते देखील घट्ट होईल. 
 
* जोडीदाराची काळजी घ्या- कोरोनाकाळात जो बघा तो घाबरलेला आहे. त्यामुळे एकमेकांच्या साथची गरज आहे. लॉक डाऊन मुळे सगळ्यांची चिडचिड होत आहे. आपण आपल्या जोडीदाराची काळजी घ्या आणि त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांना काय हवे नको ते बघा.