शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (08:40 IST)

कसं ओळखणार की समोरच्याचे आपल्यावर प्रेम आहे.जाणून घ्या टिप्स

प्रेम एक सुंदर भावना आहे.परंतु बऱ्याच वेळा काही लोक अशा व्यक्तीशी प्रेम करून बसतात ज्या व्यक्तीला त्यांच्यात काहीच स्वारस्य नसत.हे प्रेम एकतर्फी असत.ते एकतर्फी प्रेम भंग झाल्यावर मनाला खेद वाटतं.दुःख होत.आपल्याला देखील एकतर्फी प्रेम आहे तर समोरचा देखील आपल्यावर प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल या साठी काही टिप्स जाणून घ्या. 
 
* आपल्या कॉल किंवा संदेशांना प्रत्युत्तर देत नाही-आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना हे माहित नसते.आपण बऱ्याचदा त्यांच्याशी बोलतो त्यांना मेसेज करतो.जर आपल्या मेसेजला किंवा कॉल ला त्यांनी काहीच प्रतिसाद दिले नाही त्या अर्थी आपले प्रेम एकतर्फी आहे.समोरच्या व्यक्तीला आपल्यात काहीच रस नाही.
 
* दुर्लक्षित करणे- आपण एखाद्या वर प्रेम करतो तेव्हा आपण त्याच्या कडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतो.पण त्याला आपल्यामध्ये काहीच रस नसेल तर तो आपल्याकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा समजावं की आपले प्रेम एकतर्फी आहे.
 
*  फक्त मित्र म्हणतो-आपण आपल्या मनातले एखाद्याला सांगायचे असल्यास आपण संधी शोधता किंवा आपण आपल्या मनातले सर्व काही त्याला सांगितले असल्यास त्याने आपण चांगले मित्र आहोत असं म्हटल्यावर समजावं की आपले प्रेम एकतर्फी आहे.
 
*  स्वतःला सांभाळा - जेव्हा आपले प्रेम एकतर्फी आहे असं समजल्यावर काही लोक स्वतःला सांभाळू शकत नाही. ते मद्यपान करू लागतात. असं करू नका.हे चुकीचे आहे. स्वतःला सांभाळा आणि पूर्वी पासून अशा लोकांपासून चार हात लांब राहा.